पुणे: पुणे शहरातील आंबेगाव, भारती विद्यापीठ आणि मार्केटयार्ड पोलीस ठाण्यांतील घरफोडी चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना आंबेगाव पोलिसांनी जेरबंद केले आहे. या कारवाईत ४,६६,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपींची ओळख:
-
आयुष संजय खरात, वय २० वर्ष, रा. सुखसागर नगर, पुणे
-
आर्यन कैलास आगलावे, वय १९ वर्ष, रा. गोकुळनगर, पुणे
चोरीतील गुन्ह्यांची उघडकीस:
आंबेगाव पोलिसांना मिळालेल्या गोपनिय बातमीनुसार, पो. हनमंत मासाळ आणि पो. चेतन गोरे यांच्या तपास पथकाने धडक कारवाई केली. या तपासात एकूण चार गुन्ह्यांची उघडकीस आली आणि आरोपींचा सहभाग समोर आला.
🔹 गुन्हे:
-
आंबेगाव पोलीस ठाणे, गुन्हा क्र. ४५/२०२५
-
भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, गुन्हा क्र. १९७/२०२५
-
भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, गुन्हा क्र. १०७५/२०२५
-
मार्केटयार्ड पोलीस ठाणे, गुन्हा क्र. ६९/२०२५
🔹 जप्तीतील मुद्देमाल:
-
२२ ग्रॅम सोन्याचे दागिने
-
४ लॅपटॉप
-
मोटार सायकल आणि रिक्षा
-
एकूण मुददेमाल: ४,६६,०००/- रुपये






