पुणे: पुणे शहरातील मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील एक हॉटेल, “दि बिलीयन्स,” मध्ये अवैधरित्या चालवले जात असलेले हुक्का पार्लर पोलिसांनी उधळून लावले. पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट ५ ने त्वरित कारवाई करत ३२,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस निरीक्षक श्री. वाहीद पठाण, अति कार्यभार गुन्हे शाखा युनिट ५, पुणे शहर यांच्या नेतृत्वाखाली हॉटेलमध्ये छापा टाकण्यात आला. हॉटेल दि बिलीयन्स, आई माता मंदीर जवळ, मार्केटयार्ड, पुणे येथे हुक्का पॉट, फ्लेवर व इतर साहित्य जप्त करण्यात आले. या हुक्का पार्लरमधून अवैधरित्या हुक्का पुरवला जात होता.
मुख्य आरोपी:
-
आरीफ शब्बीर शेख, वय २४, रा. साईबाबा नगर, कोंढवा खुर्द, पुणे
-
३ वेटर हे काम करत होते आणि त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.
🔹 मुद्देमाल जप्त:
-
हुक्का पॉट
-
हुक्का फ्लेवर
-
इतर हुक्का साहित्य
-
रोख रक्कम: ३२,००० रुपये
🔹 विरोधात कारवाई:
-
सिगारेट व तंबाखूजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) सन २०१८ कलम ४ अ व २१ अ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
-
मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.






