Home Breaking News शिवाजी कोर्ट बसस्थानकातील प्रकार : डीसीपी गिल साहेबांचा तपास, सत्य उघडकीस आणण्याची...

शिवाजी कोर्ट बसस्थानकातील प्रकार : डीसीपी गिल साहेबांचा तपास, सत्य उघडकीस आणण्याची मागणी

98
0

पुणे – शिवाजी कोर्ट बसस्थानकात घडलेल्या प्रकारानंतर पुणे पोलिसांनी वेगवान कारवाई सुरू केली आहे. डीसीपी गिल साहेब यांनी स्वतः चौकशी केली असून, याप्रकरणी नेमकी सत्यस्थिती काय आहे हे स्पष्ट करण्यासाठी संबंधित अधिकारी आणि साक्षीदारांची जबानी घेतली जात आहे.

या घटनेबाबत बोलताना एका सामाजिक कार्यकर्त्याने सांगितले की, “सत्य माहिती मिळेपर्यंत कोणतेही आंदोलन करणार नाही. मात्र, प्राथमिक माहिती खरी आहे की नाही, याचा तपास होणे आवश्यक आहे. कोर्टात रिमांड रिपोर्ट पाहायला हवा, कारण प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील निर्णय घेता येईल.”

दरम्यान, शहराच्या प्रतिमेला धक्का बसणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. या घटनेमुळे पुणे शहराचे नाव नाहक बदनाम झाले असून, याबाबत तक्रारदारांनी आणि साक्षीदारांनी ठोस पुरावे सादर करावेत, असेही सुत्रांनी सांगितले.

आग्रा बसस्थानक व्यवस्थापनाच्या फसवणुकीचा पर्दाफाश!

याशिवाय, आग्रा बसस्थानक व्यवस्थापनाच्या फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आता संबंधित अधिकाऱ्यांना कुठलीही सुट्टी मिळणार नसून, त्यांनी कामात पारदर्शकता आणावी किंवा कायमस्वरूपी घरी बसावे, असा इशारा देण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे बसस्थानक व्यवस्थापनातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा समोर आला असून, नागरी सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रशासनावर दबाव वाढला आहे.