पुणे : कुस्तीच्या लाल मातीत घाम गाळणारा, परिश्रमाने महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावणारा आणि युवा पिढीचा प्रेरणास्थान ठरलेला पै. पृथ्वीराज मोहोळ याने ऐश्वर्य कट्ट्यावर गप्पांचा मैदान गाजवला!
२१ व्या वर्षी महाराष्ट्र केसरीचा किताब मिळवणाऱ्या पै. पृथ्वीराज मोहोळचा ‘ऐश्वर्य कट्ट्या’वर विशेष सन्मान करण्यात आला. या सोहळ्यासाठी प्रसिद्ध उद्योजक मा. श्री. प्रभाकरअण्णा मोहोळ यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. शरीर सुदृढ ठेवण्याबरोबरच हृदय निरोगी ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे हे सांगण्यासाठी प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ आणि हार्टबीट फाउंडेशनचे संस्थापक डॉ. ओंकार थोपटे यांचीही उपस्थिती आणि सन्मान करण्यात आला.
गप्पांचा कट्टा आणि महाराष्ट्र केसरीचे मनमोकळे संवाद!
गप्पांच्या रंगतदार मैफिलीत पृथ्वीराज मोहोळने त्याच्या प्रवासाबद्दल सविस्तर संवाद साधला. तो म्हणाला, “महाराष्ट्र केसरी जिंकल्यानंतर खूप ठिकाणी माझा सत्कार झाला, पण ऐश्वर्य कट्ट्यावर जसा आपुलकीने, प्रेमाने सन्मान झाला, तसा कुठेही झाला नाही! हाच सत्कार माझ्या हृदयाजवळचा आहे.”
त्याने आपल्या कुस्तीच्या वाटचालीबद्दल बोलताना सांगितले की, “गेल्या वर्षी महाराष्ट्र केसरीची संधी हुकली होती. यावर्षी मात्र मी ती मिळवली आणि गदा मोहोळ कुटुंबात आणण्याचा अभिमान मिळाला. आता माझे लक्ष्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवण्याचे आहे. हिंदकेसरी हे माझे पुढील ध्येय आहे.”
डॉ. ओंकार थोपटे यांचे आरोग्यासंबंधी महत्त्वाचे मार्गदर्शन
क्रीडापटूंनी केवळ शरीराची नाही, तर हृदयाचीही काळजी घ्यायला हवी, असे महत्त्वाचे मार्गदर्शन डॉ. ओंकार थोपटे यांनी दिले. “मी आतापर्यंत ५०,००० हृदयशस्त्रक्रिया केल्या आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयरोगाचे प्रमाण वाढते आहे. तरुणांमध्येही हृदयविकार वाढत आहेत, त्यामुळे वर्षातून एकदा हृदयाची तपासणी करणे गरजेचे आहे. पैलवानही याला अपवाद नाहीत.”
प्रभाकरअण्णा मोहोळ यांनी ऐश्वर्य कट्ट्याचे विशेष कौतुक केले!
“ऐश्वर्य कट्ट्याने समाजाला एकत्र आणण्याचे आणि गुणी व्यक्तींना सन्मानित करण्याचे महान कार्य केले आहे. अशा कट्ट्यांची संकल्पना इतर भागांतही राबवली पाहिजे,” असे प्रतिपादन मा. प्रभाकरअण्णा मोहोळ यांनी केले.
प्रमुख मान्यवर आणि क्रीडारसिक मोठ्या संख्येने उपस्थित!
या प्रसंगी अप्पा रेणुसे, विलासराव भणगे, दिलीप जगताप, पराग पोतदार, शंकर कडू, सचिन डिंबळे, सर्जेराव शिळीमकर, पांडुरंग मरगजे, नेमीचंद सोळंकी, आकाश वाडघरे, युवराज रेणुसे, संदीप फडके, विराज रेणुसे, काशिनाथ शेंडकर, मंगेश साळुंखे, नितीन राजने, रोहित रेणुसे, महावीर डाखलिया, सुनील सोनवणे, संदीप भोसले, दत्ता तोडकर, मयूर संचेती, अभिराज रेणुसे, सोनबा गोरे, चंद्रकांत पाटील, राजीव अधिकारी, शशिकांत पवार, नितेश भिकुले, अनिकेत सोनवणे, विश्वनाथ वाल्हेकर, उत्तम तनपुरे, शिवाजी मोरे आणि आप्पा रेणुसे मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ऐश्वर्य कट्ट्याची अनोखी जादू आणि महाराष्ट्र केसरीचा मनमोकळा संवाद, पुणेकरांसाठी संस्मरणीय ठरला!
पुणेकरांनो, तुम्हीही ऐश्वर्य कट्ट्यावर सहभागी व्हा आणि गप्पांच्या मैदानात तुमचा ठसा उमठवा!