गुन्हेगारी

Home गुन्हेगारी Page 38

नागपूरच्या गणेशपेठेतील ‘हॉटेल द्वारकामाई’ला बॉम्ब धमकी; सर्वजण सुरक्षित, पोलीस तपास सुरू.

0

नागपूर: शहरातील गणेशपेठ कॉलनी येथील द्वारकामाई हॉटेलला सोमवारी ई-मेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिस आणि बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. नागपूर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत हॉटेलमधील सर्व व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलवले. नागपूरचे पोलीस उपायुक्त (डीसीपी) राहुल मकनिकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, "द्वारकामाई हॉटेलला बॉम्बची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाला आहे. आम्ही तातडीने घटनास्थळी...

खोट्या बलात्काराच्या तक्रारीप्रकरणी पुण्यातील IT युवतीविरुद्ध गुन्हा दाखल!

0

पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका २२ वर्षीय IT महिला कर्मचाऱ्याने खोट्या बलात्काराच्या तक्रारीमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडवून दिली. या प्रकरणाचा तपास सुरू असताना, पोलिसांनी महिलेकडून दिलेली माहिती पूर्णतः खोटी व दिशाभूल करणारी असल्याचे स्पष्ट केले आहे. या महिलेने ३ जुलै रोजी तक्रार दिली होती की, एक ‘डिलिव्हरी एजंट’ तिच्या फ्लॅटमध्ये घुसला, काही रसायन फवारून तिला बेशुद्ध केले...

आंबेगाव पोलिसांची जलद कारवाई! तरुणावर लोखंडी हत्याराने प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न करणारे तिघे आरोपी जेरबंद

0

पुणे शहरातील आंबेगाव परिसरात घडलेल्या गंभीर घटनेत पोलिसांनी अवघ्या काही तासांतच प्रभावी कारवाई करत तीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. दोन तरुणांमध्ये झालेल्या वादातून एका तरुणावर लोखंडी हत्याराने जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, पोलिसांच्या तत्परतेमुळे आरोपींची सुटका होऊ शकली नाही. घटनेचा तपशील : घटना दि. २ नोव्हेंबर २०२५ रोजी सीसीडी कॅफे, पुणे–बेंगलोर हायवे, आंबेगाव बु. परिसरात घडली. किरकोळ वादातून उफाळलेल्या...

पुणे अँटी एक्स्टॉर्शन स्क्वॉडची धडक कारवाई! दोन खंडणीखोर अटकेत, पोलिसांकडून गुन्हेगारी टोळीवर लगाम

0

पुणे : पुणे शहर पोलिसांच्या अँटी एक्स्टॉर्शन स्क्वॉड-1 (Anti Extortion Squad-1) युनिटने ९ नोव्हेंबर रोजी मोठी कामगिरी करत खंडणी मागणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. आरोपींनी एका व्यावसायिकाला धमकावून मोठी रक्कम उकळण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी अत्यंत दक्षतेने पाळत ठेवून आरोपींना रंगेहात पकडले. ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. आरोपींची नावे रवींद्र पवार...

तासगाव हत्याकांड: बिबवेवाडी पोलिसांनी तिघा आरोपींना अटक; क्रूर हत्याकांडाचा पर्दाफाश.

0

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात वाईफळे येथे गुरुवारी सायंकाळी घडलेल्या ओंकार ऊर्फ रोहित संजय फाळके हत्याकांडातील आरोपींना बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. क्रौर्याची सीमा ओलांडून झालेल्या या हत्येमध्ये आरोपींनी कुदळ आणि तलवारीचा वापर केला होता. घटनेचा तपशील: गुरुवारी सायंकाळी सुमारे सहा वाजता वाईफळे गावात ओंकार ऊर्फ रोहित फाळके यांच्यावर आरोपी विशाल साज्जन फाळके आणि त्याच्या साथीदारांनी हल्ला केला. या हल्ल्यात ओंकार यांचा...

विदिशींसह दोन अल्पवयीन मुलांकडून दुचाकी चोरीचा पर्दाफाश!

0

पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याने मोठी कारवाई करत दोन विदिशींसह दोन अल्पवयीन मुलांकडून दुचाकी चोरीचा पर्दाफाश केला आहे. सध्या वाढत्या वाहन चोरीच्या गुन्ह्यांमुळे पुणे पोलीस सतर्क झाले असून, या संदर्भात विशेष मोहिम आखण्यात येत आहे.  पोलिसांची कसून तपासणी आणि कारवाई भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांमुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साळगावकर यांनी तपास पथकाला निर्देश दिले होते. तपासादरम्यान पोलीस...

मीरा-भाईंदर: एमबीव्हीव्ही पोलिसांनी ५१ मोबाईल परत केले; १५ लाखांच्या मोबाईलचा शोध लावला

0

मीरा-भाईंदर: नवघर पोलिसांनी हरवलेले किंवा चोरीला गेलेले ५१ मोबाईल फोन परत करत नागरिकांची दिलासा दिला आहे. या मोबाईलची एकूण किंमत सुमारे १५ लाख रुपये इतकी आहे. नागरिकांना त्यांच्या मोबाईल मिळण्याची आशा सोडून दिली असतानाच नवघर पोलिस स्टेशनकडून त्यांना फोन आला, ज्यामध्ये त्यांचे मोबाईल परत मिळणार असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांची कौशल्यपूर्ण तपासणी: चोरी किंवा हरवलेल्या मोबाईल फोनच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत वरिष्ठ...

पुण्यात हॉटेलमध्ये पत्नीला चाकूने भोसकले; नंतर स्वतःवरही हल्ला, गंभीर जखमी अवस्थेत दोघे रुग्णालयात दाखल.

0

पुण्यात बाणेर येथील एका हॉटेलमध्ये मुंबईतील रिक्षाचालकाने पत्नीला चाकूने भोसकून तिच्यावर हल्ला केला आणि नंतर स्वतःवरही चाकूने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेने हॉटेल स्टाफसह परिसरात खळबळ माजली आहे. अधिकृत माहिती: या प्रकरणातील आरोपी अमजद युसूफ मुळ्ला (वय ३९, रा. विष्णु नगर, चेंबूर, मुंबई) हा त्याच्या पत्नी नसीमा युसूफ मुळ्लासोबत पुण्यात आला होता. बाणेर येथील ग्रॅव्हिटी...

पुण्यात भाजी विक्रेत्या महिलेचा विनयभंग; कथित नगरसेवकाच्या फोन कॉलने खळबळ.

0

पुणे, १३ डिसेंबर २०२४: वडगाव शेरी भागातील कथित नगरसेवकाने एका भाजी विक्रेत्या महिलेला फोन करून "मी तुला आवडतो, तुझ्या दुकानावर येतो" असे म्हणत तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला, वय ३०, हिने दिलेल्या माहितीनुसार, ८ डिसेंबर रोजी सकाळी सव्वा सात वाजता तिच्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून...

आ. योगेश टिळेकर यांच्या मामाचा अपहरण करून खून; यवत परिसरात मृतदेह आढळला, पुण्यात खळबळ.

0

पुणे – विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचा सोमवारी सकाळी अपहरण करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सकाळी फिरायला गेलेल्या सतीश वाघ यांचे फुरसुंगी फाटा येथून अपहरण करण्यात आले आणि सायंकाळी त्यांचा मृतदेह यवत परिसरात आढळून आला. या घटनेने पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. सतीश सतबा वाघ (वय ५८, रा. फुरसुंगी फाटा, शिवारवाडी) असे अपहरण करून खून...

Copyright ©