धक्कादायक! तळेगाव दाभाडे येथे २२ वर्षीय तरुणीचा मृतदेह स्टेशन तलावात – आत्महत्या की कटकारस्थान? तपास सुरू
तळेगाव दाभाडे परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. साक्षी कांतीकुमार भावर (वय २२, रा. भीमाशंकर कॉलनी, वराळे मावळ, मूळ गाव – बऊर) हिचा मृतदेह तळेगाव दाभाडे येथील स्टेशन तलावात तरंगताना आढळून आला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीती आणि दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. साक्षी काही काळापासून बेपत्ता होती. तिच्या कुटुंबीयांनी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला,...
पुणे-बंगळूर महामार्गावर खाजगी बसची आगीत धडक! प्रवाशांचा अगदी टोकावर वाचलं.
पुणे: पुणे-बंगळूर महामार्गावर सोमवारी पहाटे एका खाजगी बसला आग लागल्याची भीषण घटना घडली. नारहे येथील स्वामिनारायण मंदिरासमोर रात्री २ वाजता घटनेची नोंद करण्यात आली. सुदैवाने, सर्व प्रवाशांनी वेळेत बस सोडल्यामुळे जीवितहानीची कोणतीही घटना घडली नाही. प्रवाशांच्या सतर्कतेमुळे टळला मोठा अपघात बसमधील एका प्रवाशाने बसमधून धूर येत असल्याचे पाहिल्यानंतर चालकाने ताबडतोब बस बाजूला काढली आणि सर्व प्रवाशांना बाहेर काढले. या सुजाण वर्तनामुळे मोठ्या...
21 वा हप्ता रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.” – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
पुणे : "केंद्र सरकार व राज्य सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21 व्या हफ्त्याचं वितरण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. यापूर्वी राज्य शासनाने ही अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून भरीव रक्कम वितरित करण्याचं काम केलं आहे. या नवीन 21 व्या हप्त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना लागवड, बियाणे, उपजीविका आणि इतर कृषी खर्चासाठी...
चिंतामणी ते निलगिरी रस्ता दत्तक घेण्याचा ऐतिहासिक निर्णय: अजित पवारांच्या आवाहनाला चिंतामणी ज्ञानपीठाचा सकारात्मक प्रतिसाद, दक्षिण पुण्यात विकासाची नवीन दिशा
पुणे (प्रतिनिधी): राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जनसहभागातून विकास करण्याच्या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद देत, चिंतामणी ज्ञानपीठ आणि ऐश्वर्या कट्टा यांनी महानगरपालिकेच्या सहकार्याने आंबेगाव परिसरातील चिंतामणी चौक ते निलगिरी चौक हा महत्त्वाचा रस्ता दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय दक्षिण पुण्यातील विकासाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. या ऐतिहासिक उपक्रमाचे उद्घाटन महापालिकेच्या उपायुक्त माधव जगताप, डॉ. विजय थोरात...
लोकशाही बळकट करण्याचा संकल्प; शेकडो लाभार्थ्यांनी घेतली मतदानाची शपथ
पिंपरी - ''आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू”, अशी मतदानाची शपथ मतदारांनी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या...
‘कौल पुण्याचा’ कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती; पुण्याच्या विकासासाठी भाजपचा निर्धार अधिक दृढ
पुणे : भारतीय जनता पार्टी पुणे शहरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘कौल पुण्याचा’ या भव्य कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती लाभली. पुणेकरांचा विश्वास आणि शहराच्या विकासासाठीचा संकल्प या कार्यक्रमातून अधिक ठामपणे अधोरेखित झाला. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, भाजप पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे तसेच पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि...
पुणे महापालिका हद्दीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षेखाली समिती नेमणार – मंत्री डॉ.उदय सामंत
नागपूर : पुणे महापालिका हद्दीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षेखाली समिती आहे. मात्र लोकप्रतिनिधीच्या मागणीनुसार विभागीय आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापण्यात येईल, असे मंत्री डॉ.उदय सामंत यांनी सांगितले. पुणे महापालिका हद्दीतील वाहतूक कोंडीबाबत सदस्य भीमराव तापकीर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर मंत्री डॉ. सामंत बोलत होते. मंत्री डॉ. सामंत म्हणाले की, पुणे महापालिका क्षेत्रातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक नियोजन...
बाणेरमध्ये मोठी कारवाई! पावणेसहा लाख रुपयांचा ‘हायड्रोफोनीक गांजा’ जप्त; शिक्षित तरुण अटकेत
पुणे शहराच्या बाणेर भागात एक धक्कादायक आणि गंभीर अंमली पदार्थ प्रकरण उघडकीस आले आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केलेल्या कारवाईमध्ये तब्बल ५,५६,४००/- रुपयांचा ‘हायड्रोफोनीक गांजा’ (Ozokush Ganja) जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई दि. १० एप्रिल २०२५ रोजी करण्यात आली असून, यामध्ये अर्जुन लिंगराज टोटिगर (वय २६, रा. सुखवानी पॅनरोमा, सुसगाव, बाणेर) या तरुणाला...
धक्कादायक! महिला डॉक्टरची गाडीत आत्महत्या; सांगली जिल्हा हादरला, निलम गोऱ्हेंची पारदर्शक चौकशीची मागणी
सांगली | सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील विठ्ठलवाडी परिसरात एका महिला डॉक्टरने आपल्या चारचाकी गाडीतच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. डॉ. शुंभागी समीर वानखडे (मु.रा. मुंबई) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून, त्या मूळच्या मुंबईतील रहिवासी होत्या. गाडीतच सापडल्या रक्ताच्या थारोळ्यात मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, डॉ. शुंभागी वानखडे यांनी ब्लेडच्या सहाय्याने हाताच्या आणि गळ्याच्या नसा कापून आत्महत्या केली. त्या घरातून "दवाखान्यात...
मोबाईल टॉर्चच्या प्रकाशातून मतदान करण्याचा दिला संदेश
पिंपरी : भक्ती शक्ती येथे जमलेल्या शेकडो युवकांनी क्षणातच वातावरण बदलले. अचानक सर्वांनी मोबाईलचे टॉर्च प्रज्वलित करत एकत्र येत ‘VOTE’ असा शब्द साकारला आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत येत्या १५ जानेवारीला मतदान करण्याचा संदेश दिला. पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक जाहीर झाली असून या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त...













