पुण्यात विधिसंघर्षीत बालकाकडून वाहनचोरी उघडकीस; १ दुचाकी व २ ऑटो रिक्षा जप्त
पुणे : पुणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे शहरातील वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा भांडाफोड झाला आहे. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक - १, गुन्हे शाखा, पुणे शहराने विशेष कारवाई करत एका विधिसंघर्षीत बालकाकडून तब्बल ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत पोलिसांनी एक दुचाकी व दोन ऑटो रिक्षा जप्त करून सुमारे १ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सहकारनगर पोलीस ठाण्यात दाखल...
‘ऊर्जासंपन्न महाराष्ट्र’चा आणखी एक टप्पा पूर्ण! तिल्लारी जलविद्युत प्रकल्पासाठी 1008 कोटींचा सामंजस्य करार – 240 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प उभारणार
मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या ऊर्जा सुरक्षेसाठी आणि हरित भविष्यासाठी घेतल्या जाणाऱ्या महत्त्वपूर्ण पावलांपैकी एक म्हणजे तिल्लारी उदंचन जलविद्युत प्रकल्प. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जलसंपदा विभाग आणि श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी नवशक्ती निर्माण संस्था, वारणानगर यांच्यात आज 240 मेगावॅट क्षमतेच्या या प्रकल्पासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या सामंजस्य करारामुळे केवळ ऊर्जा उत्पादनास गती मिळणार नाही, तर 1008...
“पुण्यातील एका बैठकीत अजित शरद पवारांवर रागावले आणि म्हणाले की तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही.”
शनिवारी पुण्यात जिल्हा नियोजन आणि विकास समिती (DPDC) ची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचे अध्यक्षपद अजित पवार यांनी भूषवले होते. या बैठकीत अजित पवार यांनी शरद पवारांना सांगितले की, आपण केवळ आमंत्रित सदस्य आहात आणि आपल्याला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्यात राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत. शनिवारी पुण्यात एक मनोरंजक घटना घडली जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे...
वरळी बीडीडी चाळ पुनर्विकासात पारदर्शकतेची मागणी – लॉटरी प्रक्रिया ठरलेल्या क्रमानेच व्हावी, रहिवाशांचा ठाम आग्रह
मुंबई: वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या लॉटरी प्रक्रियेबाबत चाळीतील रहिवाशांनी ठाम भूमिका घेतली असून, ही प्रक्रिया चाळींच्या ठरलेल्या आणि अधिकृत क्रमानेच पार पडावी, अशी जोरदार मागणी ते सातत्याने करत आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत कोणतीही संदिग्धता राहू नये, तसेच पूर्ण नियमितता आणि पारदर्शकता राखली जावी, हीच रहिवाशांची प्रमुख मागणी आहे. बी डीडी चाळ पुनर्विकास हा मुंबईतील सर्वात मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांपैकी...
साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही भरता येणार मालमत्ता कर
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून शहरात मालमत्ता कर वसुलीची मोहीम सुरू आहे. चालू आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आता केवळ दोन महिने शिल्लक राहिले आहेत. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांना कर भरण्यास अधिक सुविधा मिळाव्यात, यासाठी महापालिकेचे मुख्य कार्यालय तसेच शहरातील १८ विभागीय कर संकलन कार्यालये शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही...
स्वच्छ सर्वेक्षणात पिंपरी-चिंचवड शहराची भरारी – शहराचा देशात सातवा, राज्यात पहिला क्रमांक
पिंपरी- केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियानांतर्गत घेतलेल्या स्वच्छ सर्व्हेक्षण स्पर्धेत पिंपरी-चिंचवड शहराचा देशात ७ वा तर राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्याचबरोबर ७ स्टार गार्बेज फ्री सिटी व वॉटर प्लस असे पुन्हा एकदा मानांकन मिळविले आहे. गतवर्षी स्वच्छ सर्वेक्षणामध्ये शहराचा देशात १० वा तर राज्यात तिसरा क्रमांक प्राप्त झाला होता. यावेळी शहराचा राज्यात पहिल्यांदाच प्रथम क्रमांक आला आहे. दिल्ली येथे...
पुणे महानगरपालिकेत प्रजासत्ताक दिनाचा गौरवशाली सोहळा; ध्वजारोहण, संविधान वाचन व महापुरुषांना अभिवादन
पुणे | प्रतिनिधी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणे महानगरपालिकेमध्ये सोमवार, दि. २६ जानेवारी २०२६ रोजी अत्यंत सन्मानपूर्वक ध्वजारोहण व ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडला. या सोहळ्यात मा. नवल किशोर राम, प्रशासक तथा आयुक्त, पुणे महानगरपालिका यांच्या शुभहस्ते राष्ट्रध्वज फडकावण्यात आला आणि तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मा. आयुक्त नवल किशोर राम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनाधिष्ठित पुतळा, महात्मा ज्योतिबा फुले यांचा...
निगडी प्रकरणात न्यायालयीन आदेशाचा अवमान; PCMC पोलिस आयुक्तांविरोधात अवमान याचिका, उच्च न्यायालयाची नोटीस
पुणे : निगडी, पुणे येथील एका गंभीर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दिनांक 09 जून 2025 रोजी दिलेल्या स्पष्ट, ठोस व बंधनकारक आदेशाचे जाणीवपूर्वक उल्लंघन झाल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महानगर पोलिस आयुक्त (PCMC Police Commissioner) यांच्याविरोधात थेट Contempt of Court Act, 1971 अंतर्गत अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे प्रशासकीय यंत्रणेतील उत्तरदायित्व आणि कायद्याच्या...
पुणे ग्रँड चॅलेंज टूर 2026 मुळे शाळांना अर्धदिवस सुट्टी – 23 जानेवारीला दुपारी 12 नंतर पुणे मनपा हद्दीतील सर्व शाळा बंद
पुणे (दि. 21): पुणे ग्रँड चॅलेंज टूर–2026 या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या चौथ्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व सरकारी व खाजगी शाळांसाठी विशेष आदेश जारी करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डूडी यांनी दिलेल्या आदेशानुसार, 23 जानेवारी रोजी सर्व शाळा दुपारी 12 वाजेपर्यंत सुरू राहतील आणि त्यानंतर शाळा बंद ठेवण्यात येतील. या स्पर्धेचा चौथा...
मुख्य बातमी : नागालँड विद्यापीठाच्या ८व्या दीक्षांत समारंभाला उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची उपस्थिती; विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा
भारताचे उपराष्ट्रपती C. P. Radhakrishnan यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच Nagaland राज्याला भेट दिली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी Nagaland University च्या लुमामी परिसरात आयोजित ८व्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. या कार्यक्रमात पदवी, पदव्युत्तर आणि संशोधन अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. या प्रसंगी उपराष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, देशाच्या विकासात तरुणांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शिक्षण,...








