0
0
0
0
0

सामाजिक

Home सामाजिक Page 171

पुणे वाहतूक पोलीस अकादमीच्या पहिल्या प्रशिक्षण सत्राचा यशस्वी समारोप!

मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पुणे वाहतूक पोलीस अकादमीचे पहिले प्रशिक्षण सत्र अत्यंत यशस्वीरीत्या पार पडले. २३ फेब्रुवारी २०२५ ते २५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत झालेल्या या विशेष सत्रामध्ये वाहतूक शाखेतील अधिकारी व अंमलदार यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात आले.  वाहतूक पोलीस दलासाठी व्यापक प्रशिक्षणाचा उपक्रम! सदर प्रशिक्षण सत्रात वाहतूक पोलिसांना सॉफ्ट स्किल्स, मानसोपचार, मोटार वाहन कायदा,...

‘महाराष्ट्र केसरी’ पै. पृथ्वीराज मोहोळ ऐश्वर्य कट्ट्यावर रमला – गप्पांचा मैदान गाजला!

0

पुणे : कुस्तीच्या लाल मातीत घाम गाळणारा, परिश्रमाने महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावणारा आणि युवा पिढीचा प्रेरणास्थान ठरलेला पै. पृथ्वीराज मोहोळ याने ऐश्वर्य कट्ट्यावर गप्पांचा मैदान गाजवला! २१ व्या वर्षी महाराष्ट्र केसरीचा किताब मिळवणाऱ्या पै. पृथ्वीराज मोहोळचा 'ऐश्वर्य कट्ट्या'वर विशेष सन्मान करण्यात आला. या सोहळ्यासाठी प्रसिद्ध उद्योजक मा. श्री. प्रभाकरअण्णा मोहोळ यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. शरीर सुदृढ ठेवण्याबरोबरच हृदय...

पुण्यात सराईत गुन्हेगाराला अटक – गावठी पिस्टल आणि जिवंत काडतुसे जप्त!

नांदेड सिटी पोलीस दलाची यशस्वी कारवाई – गुन्हेगारी कृत्यांना लगाम घालण्यासाठी मोठे पाऊल!  पुणे शहराच्या नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने गुन्हेगारी जगतात वर्चस्व गाजवणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला मोठ्या शिताफीने अटक केली. प्रज्वल भास्कर थोरात (वय २१, रा. व्यंकटेश विश्व सोसायटी, मानाजीनगर, न-हे, पारेकंपनी रोड, पुणे) या गुन्हेगाराकडून गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. बातमीदाराच्या खात्रीशीर माहितीवरून...

मुंबईच्या देवदूतांचा सन्मान! ‘एंजल्स ऑफ मुंबई 2024’ मध्ये 15 समाजसेवकांचा गौरव

मुंबईतील परिवर्तन घडवणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी ‘द फ्री प्रेस जर्नल’च्या विशेष उपक्रमांतर्गत ‘एंजल्स ऑफ मुंबई - सीझन 2024’ पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या भव्य सोहळ्यात समाजासाठी निःस्वार्थ सेवा करणाऱ्या १५ व्यक्तींना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी सन्मानित करण्यात आले. वर्लीतील शानदार सोहळा : मुंबईच्या सेवेकरी व्यक्तिमत्त्वांचा गौरव गुरुवारी वर्लीतील ‘जेड लक्झरी बँक्वेट’ येथे हा भव्य सोहळा पार पडला. या...

मुंबईत आगीचा धुमाकूळ : लोहार चाळ, मरीन लाइन्स आणि विलेपार्ले येथील इमारतींना आग, अनेकांची सुटका

मुंबई शहरात शनिवारी वेगवेगळ्या ठिकाणी लागलेल्या आगीच्या घटनांनी खळबळ उडवली. लोहार चाळ, मरीन लाइन्स आणि विलेपार्ले येथील इमारतींना लागलेल्या आगीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली, मात्र आगीच्या घटनांमुळे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. विलेपार्लेतील हॉटेल फेअरमाँटच्या रूफटॉपला भीषण आग विलेपार्ले (पूर्व) येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळ असलेल्या हॉटेल फेअरमाँटच्या रूफटॉप रेस्टॉरंटमध्ये शनिवारी संध्याकाळी...

भोसरीत थरारक हत्या प्रकरण! महिलेचा मृतदेह पोत्यात बांधून निर्जन स्थळी टाकला

पिंपरी-चिंचवड : एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जाधववाडी मोशी येथे एका अनोळखी महिलेचा थरारक खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी निर्घृणपणे महिलेचा खून करून तिचा मृतदेह पोत्यात भरून जाधववाडी, मोशी येथील मातेरे हाऊस चौकाजवळ निर्जन स्थळी फेकून दिला. शुक्रवारी (दि. २१) रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार समोर आला असून, या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मृतदेह ओळख पटू...

नॅसकॉम टेक्नॉलॉजी अँड लीडरशिप फोरम 2025 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उत्स्फूर्त स्वागत!

मुंबई: बीकेसी येथे आयोजित 'नॅसकॉम टेक्नॉलॉजी अँड लीडरशिप फोरम 2025' मध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन झाले असता नॅसकॉमच्या टीमकडून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. या प्रतिष्ठित फोरममध्ये तंत्रज्ञान, नेतृत्व आणि डिजिटल परिवर्तन या विषयांवर विचारमंथन होणार असून, देशभरातील तंत्रज्ञान क्षेत्रातील मान्यवर तसेच आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ या मंचावर उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात वेगाने...

वानखेडे स्टेडियमला सुवर्ण महोत्सवी वर्ष – क्रिकेट रसिकांसाठी अभिमानाचा क्षण!

मुंबई: क्रिकेटप्रेमींचे पवित्र मंदिर समजल्या जाणाऱ्या वानखेडे स्टेडियमला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या विशेष प्रसंगी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. अजिंक्य नाईक यांनी सदिच्छा भेट घेऊन वानखेडे स्टेडियमच्या गौरवशाली इतिहासाला उजाळा दिला. या वेळी स्टेडियमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आणि क्रिकेटच्या भविष्यासाठी नवनवीन संकल्पना राबवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.  वानखेडे स्टेडियम – ५० वर्षांचा सुवर्ण प्रवास! वानखेडे स्टेडियमची स्थापना...

पश्चिम विभागीय परिषदेच्या २७व्या बैठकीसाठी केंद्रीय मंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचे पुण्यात आगमन!

पुणे – केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात पश्चिम विभागीय परिषदेच्या २७व्या बैठकीला हजेरी लावली. या महत्वपूर्ण बैठकीत महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि केंद्रशासित प्रदेश दादरा-नगर हवेली, दमण-दीव यांच्यातील विविध विकासकामे, सहकार धोरणे आणि प्रशासकीय मुद्द्यांवर सखोल चर्चा होणार आहे.  या बैठकीत हे मुद्दे येणार चर्चेत 🔹 पश्चिम भारतातील सहकार क्षेत्राच्या सक्षमीकरणावर चर्चा🔹...

महापालिकेच्या वतीने २१ ते २४ फेब्रुवारी या कालावधीत पवनाथडी जत्रेचे आयोजन.

पिंपरी - महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी महापालिकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सांगवी  येथील पी. डब्ल्यू. डी. मैदानावर २१ ते २४ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या जत्रेमध्ये महाराष्ट्राची संस्कृती व शहराच्या परंपरा यांची सांगड घालून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.          ...

Copyright ©