जगातील सर्वात उंच स्मारक – स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण : धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या शौर्याला अभिवादन
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचे शौर्य, पराक्रम आणि हिंदवी स्वराज्याच्या संरक्षणासाठी दिलेले बलिदान आजही जनमानसात प्रेरणादायी आहे. आता त्यांच्या स्मृती जपण्यासाठी आणि त्यांचा इतिहास पुढील पिढ्यांना समजावा यासाठी जगातील सर्वात उंच स्मारक उभारण्यात येत आहे. या स्मारकाला “स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण” असे नाव देण्यात आले आहे. या भव्य स्मारकाच्या उभारणीमुळे महाराष्ट्राचे सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि अस्मितेचे प्रतीक म्हणून जगभरात नवे स्थान...
कोथरूड–बावधनमध्ये अतिक्रमणांवर संयुक्त धडक कारवाई; ६ हातगाड्या, २५ शेडसह मोठा मुद्देमाल जप्त
पुणे : दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी Pune Municipal Corporation च्या कोथरूड–बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत अतिक्रमणांविरोधात संयुक्त धडक कारवाई करण्यात आली. अतिक्रमण निर्मूलन विभाग आणि बांधकाम विभागामार्फत ही मोहीम राबवण्यात आली. वाढत्या अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. या कारवाईत महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान तसेच बिगारी सेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कोथरूड–बावधन क्षेत्रीय...
पुण्यात मर्सिडीजचा भीषण अपघात; हिट अँड रनमुळे तरुणाचा जागीच मृत्यू
पुणे – शहरात पुन्हा एकदा हिट अँड रनचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवले ब्रिजजवळ भरधाव वेगात असलेल्या मर्सिडीज कारने एका दुचाकीस्वाराला उडवल्याने चिंचवडमधील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव कुणाल हुशार (राहणार – चिंचवड) असे असून, ही घटना शनिवारी (३ मे २०२५) पहाटे सुमारे चारच्या सुमारास घडली. अपघात...
यशाचे रहस्य जाणून घ्यायचे असेल तर अथक परिश्रम करा-प्रा.नितीन बानुगडे – “आयआयबी” तर्फे आयोजित मार्गदर्शन मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
यशाचे रहस्य म्हणजे मागे हटणे नाही आणि अथक परिश्रम करणे आणि जर तुम्ही त्याचे पालन केले तर डॉक्टर, इंजिनिअर, वैज्ञानिक बनण्याचा तुमचा दृढनिश्चय सार्थकी लागेल. “तुम्ही कोण आहात, यापेक्षा कोण होणार आहात, याचा विचार करा. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि चांगले मार्गदर्शन घेण्यावर भर द्या. जितके जास्त कष्ट घ्याल, तितकेच मोठे यश मिळते. कुठलेही काम लहान, अवघड नसते. मनातून...
मालाड वॉर्ड क्र. ५० मध्ये तन्वी दिनेश राव यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन; आदित्य ठाकरे यांची उपस्थिती
मुंबई : आज मालाड येथील वॉर्ड क्रमांक ५० मधील उमेदवार तन्वी दिनेश राव यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे उपस्थित होते. कार्यालयाच्या उद्घाटनानंतर नागरिक, कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत उमेदवाराला शुभेच्छा दिल्या. या वेळी बोलताना उपस्थित नेत्यांनी स्थानिक विकास, मूलभूत सुविधा, महिला सक्षमीकरण, स्वच्छता, आरोग्य व शिक्षण...
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा उत्साहात संपन्न…
पिंपरी :- जगात सर्वत्र तंत्रज्ञानाचे वारे वाहत आहे. आजकाल प्रत्येक पालकांच्या हातात चोवीस तास मोबाईल दिसत आहे. त्याचेच अनुकरण घरातील लहान मुले मोबाईलचा वापर करतांना दिसत आहेत. त्यामुळे मोबाईल वापरामुळे विचार करण्याची क्षमता खुंटत चालली आहे. मुलांचे आरोग्याकडील लक्ष कमी होत आहे. लहान मुलांनी मैदानी व बौद्धिक खेळ खेळले पाहिजेत त्यासाठी पालकांनी पुढाकार घेतला तरच आपल्या पाल्यांचे आरोग्य व्यवस्थित राहील...
बुंधगाव पोलिस ठाण्याची मोठी कारवाई – अवैध दारू जप्त, आरोपी अटकेत!
पुणे : बुंधगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी धाडसी कारवाई करत अवैध दारूचा मोठा साठा जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला असता, बुंधगाव परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री होत असल्याचे उघड झाले. या छाप्यातून ९१ लिटर अवैध दारू, किंमत सुमारे ५० हजार रुपये एवढा...
नुवाकोट जिल्ह्यात नेपाळमध्ये हेलिकॉप्टर अपघात; 5 जणांचा मृत्यू.
बुधवारी नेपाळच्या नुवाकोट जिल्ह्यातील शिवपुरी परिसरात एअर डायनेस्टी हेलिकॉप्टर कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. हे हेलिकॉप्टर काठमांडूपासून स्याफ्रुबेंसीकडे जात होते, असे स्थानिक माध्यमांनी सांगितले. वरिष्ठ कॅप्टन अरुण मल्ला यांच्या नियंत्रणाखालील या हेलिकॉप्टरने उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या तीन मिनिटांनी ग्राऊंड स्टाफशी संपर्क तुटला होता. हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह एकूण पाच जण प्रवास करत होते, ज्यामध्ये चार चीनी नागरिकांचा...
ससून रुग्णालयातील भीषण स्थिती – व्हीलचेअर न मिळाल्यामुळे आजारी रुग्णाला उन्हात चालवत नेलं, सामाजिक कार्यकर्त्यांचा संताप
पुणे – एकीकडे सरकार आरोग्यसेवा सक्षम असल्याचे दावे करत असताना, दुसरीकडे राज्याच्या मोठ्या सरकारी रुग्णालयांपैकी एक असलेल्या ससून रुग्णालयातील वास्तव भयावह आहे. एका गंभीर रुग्णाला व्हीलचेअर मिळाली नाही, त्यामुळे त्याला रुग्णालयाच्या मुख्य इमारतीपर्यंत उन्हात चालवत आणावे लागले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. "ससूनमध्ये सुविधा नव्हे, फक्त आश्वासन!" रुग्णालयात असंख्य रुग्ण...
महाराष्ट्र मंत्रिमंडळ खातेवाटपाची उत्सुकता! 39 नव्या मंत्र्यांचा शपथविधी पूर्ण, खातेवाटपाची प्रतीक्षा विस्तारित बातमी:
महाराष्ट्रात मोठ्या राजकीय हालचालींनंतर अखेर 39 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. राज्यात सत्तेचा समतोल राखण्यासाठी विविध पक्षांच्या नेत्यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आले आहे. मात्र, खातेवाटपाबाबत सर्वांचे लक्ष लागले आहे. नव्या मंत्र्यांना कोणती खाती मिळतील आणि सत्तेत कुणाला किती वाटा मिळेल, याबाबत मोठी राजकीय उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, या मंत्रिमंडळ विस्तारात स्थानिक पातळीवर प्रभावशाली नेत्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. राजकीय...












