ठाणे शहराच्या सौंदर्यात ऐतिहासिक भर; खाडीकिनारी २६० मीटर उंच भारतातील सर्वात उंच व्हिविंग टॉवरसह भव्य विकास प्रकल्पांचे सादरीकरण
मुंबई | ठाणे प्रतिनिधी ठाणे शहराला जागतिक दर्जाचे आधुनिक स्वरूप देण्यासाठी ठाणे महानगरपालिकेकडून राबवण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्पांचे आज सविस्तर सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणात ठाणे खाडीकिनारी उभारण्यात येणारा २६० मीटर उंच भारतातील सर्वात उंच व्हिविंग टॉवर हा विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. या प्रकल्पांमुळे ठाणे शहराचा नकाशाच बदलणार असून पर्यटन, रोजगार आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. ठाणे खाडीकिनारी तब्बल...
धक्कादायक – शेफाली जरीवालाचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन; मनोरंजन विश्वावर शोककळा
मुंबई : मनोरंजन विश्वातून एक अत्यंत दु:खदायक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘काँटा लगा’ गाण्यातून प्रचंड प्रसिद्धी मिळवणारी अभिनेत्री आणि ‘बिग बॉस 13’ फेम शेफाली जरीवाला हिचं वयाच्या अवघ्या 42 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. 27 जूनच्या रात्री, तिला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तिला मुंबईतील बेलव्यू मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र, तत्काळ वैद्यकीय मदत...
महाराष्ट्राच्या अमृत महोत्सवाकडे वाटचाल करताना रचनात्मक कार्यासाठी एकत्र येऊया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आजही देशातील सर्वाधिक सक्षम आणि स्थिर असून, सर्व आर्थिक निकषांवर राज्य पात्र ठरत आहे. कर्ज, राजकोषीय तूट, गुंतवणूक, रोजगारनिर्मिती, सिंचन, वीज, दळणवळण आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात राज्याने भरीव काम केले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना सांगितले. राज्याची अमृत महोत्सवाकडे वाटचाल सुरू असताना पुढचा काळ महाराष्ट्रासाठी अत्यंत निर्णायक असल्याचे नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातील सर्व ...
‘कौल पुण्याचा’ कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती; पुण्याच्या विकासासाठी भाजपचा निर्धार अधिक दृढ
पुणे : भारतीय जनता पार्टी पुणे शहरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘कौल पुण्याचा’ या भव्य कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती लाभली. पुणेकरांचा विश्वास आणि शहराच्या विकासासाठीचा संकल्प या कार्यक्रमातून अधिक ठामपणे अधोरेखित झाला. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, भाजप पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे तसेच पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि...
वाघोली पोलिसांची मोठी कारवाई : लाखोंचा मुद्देमाल जप्त
वाघोली – वाघोली पोलिस ठाण्याच्या पथकाने मोठ्या धाडसाने केलेल्या कारवाईत तब्बल ₹10 लाख 86 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध हालचालींवर मोठा आळा बसला असून, नागरिकांनी पोलिसांच्या या तात्काळ कारवाईचे स्वागत केले आहे. ही कारवाई 28 ऑगस्ट रोजी करण्यात आली. पोलिसांच्या गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी संशयित ठिकाणी छापा टाकला. कारवाईदरम्यान विविध प्रकारचा मुद्देमाल हस्तगत करण्यात...
उद्योगमंत्री उदय सामंत रुग्णालयात दाखल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली भेट, प्रकृतीत सुधारणा
मुंबई | महाराष्ट्राचे उद्योगमंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शनिवारी रात्री अचानक प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून उपचारांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. गेल्या आठवड्यात नागपूर येथे पार पडलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उदय सामंत यांनी सक्रिय सहभाग घेतला...
एमआयटी एडीटी आणि ॲडमिशन सजेशन आयोजित करिअर गायडन्स सेमिनार संपन्न
पिंपरी चिंचवड : एमआयटी एडीटी विद्यापीठ, पुणे आणि ॲडमिशन सजेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'बारावी नंतर पुढे काय?' या विषयावर मोफत करिअर गायडन्स सेमिनार आयोजित करण्यात आला होता. या सेमिनारला विद्यार्थ्यांचा, शिक्षकांचा तसेच पालकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. तसेच या निमित्ताने पिंपरी चिंचवड शहरातील तज्ञ शिक्षकांना 'गुरु गौरव पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. या सेमिनार मध्ये विद्यार्थ्यांना एमआयटी एडीटी विद्यापीठाचे विद्यार्थी कार्य...
पुणे वाहतूक विभागाचा मोठा निर्णय: गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीसाठी सिंहगड रोड, धायरी, येरवडा व विश्रांतवाडी परिसरात वाहतूक बदल लागू
पुणे शहरातील सिंहगड रोड, धायरी, येरवडा आणि विश्रांतवाडी परिसरात गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीसाठी आज वाहतूक विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दरवर्षीप्रमाणे, या परिसरातून अनेक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका पार पडत असल्याने सामान्य नागरिकांची वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विशेष मार्ग बदल लागू करण्यात आले आहेत. सिंहगड रोड व धायरी परिसर:आज एकूण ८६ गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकांचे आयोजन आहे. मिरवणूक नऱ्हे, धायरी, उंबऱ्या गणपती...
बकरी ईद सणासाठी परिमंडळ ५ मध्ये महत्त्वपूर्ण समन्वय बैठक; मौलाना, ट्रस्टी, कुरेशी आणि प्रशासनाची उपस्थिती
बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर दिनांक ३० मे २०२५ रोजी सायं. ४.३० ते ५.३० दरम्यान परिमंडळ ५ कार्यालयात एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत परिमंडळ ५ मधील सर्व मस्जिदचे मौलाना, ट्रस्टी, कुरेशी समाजाचे प्रतिनिधी, पुणे मनपा व कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अधिकारी, कत्तलखान्याचे मुकादम तसेच स्थानिक पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीचे आयोजन आगामी बकरी ईद सणाचे शांततेत आणि...
एअर इंडिया विमान अपघातानंतर कडक पावले; पुणे-दिल्लीसह ९ फ्लाईट्स रद्द, बर्ड-हिटमुळे एक विमान थांबवले
मुंबई/दिल्ली – एअर इंडिया कंपनीने मोठा निर्णय घेत सुरक्षिततेच्या दृष्टीने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा एकूण ९ फ्लाईट्स रद्द केल्या आहेत. यामध्ये पुणे-दिल्ली दरम्यानची AI2470 फ्लाईट पक्षी धडकेनंतर ग्राउंड करण्यात आली आहे. तसेच, अहमदाबाद-लंडन AI171 विमान अपघातानंतर कंपनीकडून Boeing 787 Dreamliner विमाने तपासणीसाठी थांबवण्यात येत आहेत. AI2470: पक्षी धडकेनंतर तपासणीसाठी थांबवले विमान दिल्लीहून पुण्याला येणाऱ्या AI2470 फ्लाईटला पक्षी धडकला. पुण्यात सुरक्षित लँडिंग...











