महाराष्ट्र

Home महाराष्ट्र Page 65

प्रशिक्षक विवेक मालशे यांचे यश अभिमानास्पद – अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे

0

पिंपरी : नवी दिल्ली येथे इंडीयन डेफ क्रिकेट असोसिएशन (आयडीसीए) तर्फे ९ व्या टी-२० राष्ट्रीय डेफ क्रिकेट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र मूकबधिर क्रिकेट संघाने जम्मू काश्मीर मूकबधिर क्रिकेट संघाचा ८ धावांनी पराभव करत विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाचे भांडारपाल विवेक मालशे मोलाचा वाट उचलला. या स्पर्धेत प्रशिक्षक या नात्याने...

नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या तयारीला वेग! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न

0

नाशिक | १३ नोव्हेंबर २०२५ | दु. २.२० वा. :- आगामी ‘सिंहस्थ कुंभमेळा २०२७’ निमित्त नाशिक शहर आणि परिसरात होणाऱ्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्याचा भव्य कार्यक्रम आज पार पडला. या ऐतिहासिक क्षणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादाजी भुसे, मंत्री ॲड. माणिकराव...

पुण्यात नवले पुलाजवळ भीषण साखळी अपघात! चालत्या कंटेनरने अचानक ब्रेक दाबल्याने कार दोन कंटेनरमध्ये चिरडली; ५ जणांचा जागीच मृत्यू, २० जखमी

0

पुणे | पुणे-बेंगळुरू महामार्गावरील नवले पुल परिसरात पुन्हा एकदा भीषण अपघात घडला असून, या अपघाताने संपूर्ण परिसरात हाहाकार माजवला आहे. गुरुवारी संध्याकाळी घडलेल्या या भीषण घटनेत दोन कंटेनर आणि एका कारचा जबरदस्त अपघात झाला. धडकेनंतर काही क्षणातच दोन्ही कंटेनरना आग लागली आणि त्यांच्या मधोमध अडकलेल्या कारने पेट घेतला. या घटनेत आतापर्यंत ५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून, २० हून...

गुन्हे शाखा युनिट-२ची मोठी कारवाई! रेकॉर्डवरील तीन गुन्हेगारांकडून ४ पिस्तुलं आणि ५ जिवंत काडतुसे जप्त

0

पिंपरी चिंचवड | पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत सुरू असलेल्या घातक अग्निशस्त्रे शोध मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने एका धाडसी कारवाईत रेकॉर्डवरील तीन सराईत गुन्हेगारांना अटक करून त्यांच्या ताब्यातून ४ पिस्तुले आणि ५ जीवंत काडतुसे जप्त केली आहेत. या कारवाईमुळे शहरात संभाव्य गंभीर गुन्ह्यांचे प्रयत्न वेळेवर हाणून पाडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. ही कारवाई पिंपरी...

केयूडब्ल्यूजे महाराष्ट्र निवडणुकीत डॉ. शिवा मुदिगेरे अध्यक्ष, दयानंद सल्यान सरचिटणीस म्हणून बिनविरोध निवडून; पत्रकार संघटनेला नवे नेतृत्व

0

नवी मुंबई :- पत्रकारितेच्या क्षेत्रातील एक प्रतिष्ठित आणि मान्यताप्राप्त संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्नाटक वर्किंग जर्नलिस्ट असोसिएशन (Karnataka Working Journalists Association - KUWJ) च्या महाराष्ट्र युनिटच्या निवडणुकीत नव्या नेतृत्वाची निवड झाली आहे. २०२५ ते २०२८ या कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत डॉ. शिवा मुदिगेरे यांची अध्यक्षपदी, तर सा. दया (दयानंद सल्यान) यांची सरचिटणीसपदी एकमताने व बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडणुकीची...

एमआयटी एडीटी आणि ॲडमिशन सजेशन आयोजित करिअर गायडन्स सेमिनार संपन्न

0

पिंपरी चिंचवड : एमआयटी एडीटी विद्यापीठ, पुणे आणि ॲडमिशन सजेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'बारावी नंतर पुढे काय?' या विषयावर मोफत करिअर गायडन्स सेमिनार आयोजित करण्यात आला होता. या सेमिनारला विद्यार्थ्यांचा, शिक्षकांचा तसेच पालकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. तसेच या निमित्ताने पिंपरी चिंचवड शहरातील तज्ञ शिक्षकांना 'गुरु गौरव पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले.  या सेमिनार मध्ये विद्यार्थ्यांना एमआयटी एडीटी विद्यापीठाचे विद्यार्थी कार्य...

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाश्वत विकासकामांचा जागतिक पातळीवर सन्मान….

0

पिंपरी :-  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख मजबूत केली आहे. स्पेनमधील बार्सिलोना येथे ४ ते ६ नोव्हेंबरदरम्यान झालेल्या 'स्मार्ट सिटी एक्स्पो वर्ल्ड काँग्रेस २०२५' दरम्यान आयोजित 'आंतरराष्ट्रीय शहरी आणि प्रादेशिक सहकार्य (IURC) ग्लोबल थीमॅटिक नेटवर्किंग कार्यशाळेत' सहभागी होण्यासाठी भारतातील सहा पायलट शहरांपैकी एक म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला आमंत्रित करण्यात आले होते. सदर कार्यशाळेत मुख्य अभियंता संजय कुलकर्णी आणि सहशहर अभियंता बापू...

पुणे अँटी एक्स्टॉर्शन स्क्वॉडची धडक कारवाई! दोन खंडणीखोर अटकेत, पोलिसांकडून गुन्हेगारी टोळीवर लगाम

0

पुणे : पुणे शहर पोलिसांच्या अँटी एक्स्टॉर्शन स्क्वॉड-1 (Anti Extortion Squad-1) युनिटने ९ नोव्हेंबर रोजी मोठी कामगिरी करत खंडणी मागणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. आरोपींनी एका व्यावसायिकाला धमकावून मोठी रक्कम उकळण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी अत्यंत दक्षतेने पाळत ठेवून आरोपींना रंगेहात पकडले. ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. आरोपींची नावे रवींद्र पवार...

पुणे गुन्हे शाखा युनिट-6 ची मोठी कारवाई! तब्बल ₹18 लाखांचा जुगार अड्डा उध्वस्त, 17 जुगारी अटकेत

0

पुणे : पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-6 ने मोठी धडक कारवाई करत बेकायदेशीर जुगार अड्डा उध्वस्त केला आहे. या कारवाईत तब्बल ₹18 लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 17 आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई 8 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने बाणेर परिसरातील एका ठिकाणी छापा टाकला. पोलिसांनी...

पुण्यात ‘दृश्यम ३’ फिल्मीस्टाईल खुनाचा उलगडा! वारजे पोलिसांनी उघडकीस आणली धक्कादायक कहाणी

0

पुणे : पुणे शहरातील वारजे माळवाडी पोलिसांनी अत्यंत गुंतागुंतीच्या आणि फिल्मी पद्धतीने केलेल्या खुनाचा उलगडा केला आहे. हा खून “दृश्यम ३” सिनेमाच्या कथानकासारखा असल्याने संपूर्ण पुण्यात या घटनेची चर्चा रंगली आहे. आरोपी दुसरा कोणी नसून मृत महिलेचा पतीच आहे, ज्याने आपल्या पत्नीवर संशय आल्यामुळे थरारक पद्धतीने तिचा खून केला. दिनांक २८ ऑक्टोबर २०२५ रोजी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात एक महिला...

Copyright ©