महाराष्ट्र
जागतिक थेट प्रक्षेपणातून जिल्ह्याचे वैभव अधोरेखित; क्रीडा, संस्कृती, इतिहास व आधुनिकतेचा संगम जगासमोर
पुणे : ‘पुणे ग्रँड टूर–२०२६’ या प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा आज अंतिम टप्पा पूर्ण होताच ही स्पर्धा यशस्वीरीत्या संपन्न झाली. उत्कृष्ट नियोजन, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा, शिस्तबद्ध व्यवस्थापन आणि पुणे व पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ही स्पर्धा देश-विदेशातील क्रीडाप्रेमींसाठी अविस्मरणीय ठरली. या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण भारत व भारतीय उपखंडात ‘स्टार स्पोर्ट्स’ आणि ‘जिओ हॉटस्टार’वर, तर युरोपसह जगातील ७० हून अधिक...
लातूर जिल्हा परिषद निवडणूक रणधुमाळी; एकूर्गा गटात काँग्रेस–महाविकास आघाडीचा जोरदार प्रचार
लातूर | ग्रामीण प्रतिनिधी लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून, एकूर्गा जिल्हा परिषद गटातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. दत्तात्रय काकासाहेब टेकाळे आणि एकूर्गा पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार सौ. पूजा गणेश ढगे यांच्या प्रचारासाठी मुरूड अकोला येथे भव्य कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत मतदारांशी थेट...
थकबाकीदारांनो सावधान! पिंपरी चिंचवड महापालिकेने सुरू केली जप्ती कारवाई.
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत मालमत्ता कर वसुलीसाठी जप्ती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून २१ जानेवारी २०२६ पासून ही मोहिम शहरभर व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे. या संदर्भात झालेल्या आढावा बैठकीत महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर व कर आकारणी व कर संकलन विभागाचे उपायुक्त...
वांद्रे स्कायवॉक अखेर सज्ज! प्रवाशांना मोठा दिलासा, 26 जानेवारीपासून वापरासाठी खुला
मुंबई | प्रतिनिधी मुंबईतील पश्चिम रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. वांद्रे पूर्व येथील बहुप्रतीक्षित स्कायवॉक अखेर पूर्ण झाला असून, येत्या 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर तो सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. 2019 पासून रखडलेल्या या प्रकल्पामुळे लाखो प्रवाशांना होणारा त्रास आता संपणार आहे. हा स्कायवॉक बीएमसीने उभारलेला असून, तो थेट वांद्रे स्टेशन रोड ओलांडत महामार्गाला जोडतो...
भारतीय सायकलिंगला गौरवशाली क्षण; हर्षवीर सिंग यांना ‘ब्ल्यू जर्सी’ने सन्मानित
पुणे | प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या निमित्ताने भारतीय क्रीडाक्षेत्रासाठी एक अभिमानास्पद क्षण अनुभवायला मिळाला. मा. महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम यांच्या हस्ते सर्वोत्तम भारतीय सायकलपटू श्री. हर्षवीर सिंग यांना ब्ल्यू जर्सी प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या सन्मानामुळे भारतीय सायकलिंगच्या क्षितिजावर देशी खेळाडूंची चमक अधिक ठळकपणे अधोरेखित झाली आहे. यावेळी स्पर्धेतील इतर विजेत्या भारतीय सायकलपटूंनाही पदके प्रदान करण्यात आली, तसेच...
पुणे ग्रँड टूर २०२६ : आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार, जर्सींची लढत अधिक रंगतदार
पुणे | प्रतिनिधी ‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ या प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय UCI मानांकन प्राप्त सायकल स्पर्धेने पहिल्याच टप्प्यात प्रेक्षकांना रोमांचित केले. जागतिक दर्जाच्या सायकलपटूंनी दिलेल्या जबरदस्त स्पर्धेमुळे पुणे शहर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रीडा नकाशावर झळकले. पहिल्या टप्प्यात एस्टोनियाच्या ‘क्विक प्रो टीम’चा अँड्रियास मॅटिल्डास याने ०२:००:२७ या वेळेसह दुसरा क्रमांक पटकावला, तर बेल्जियमच्या ‘टार्टलेटो-इसोरेक्स’ संघाचा योर्बेन लॉरीसन याने ०२:००:३० वेळ नोंदवत तिसरा...
खंडणीविरोधी पथकाची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्टल व जिवंत काडतुसे जप्त
पुणे शहरातील वाढत्या गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अत्यंत प्रभावी आणि वेळेत कारवाई करत एका सराईत गुन्हेगारास अटक केली असून त्याच्याकडून गावठी पिस्टल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीला मोठा धक्का बसला आहे. दिनांक १८ जानेवारी २०२५ रोजी खंडणीविरोधी पथक-१, गुन्हे शाखा, पुणे शहरचे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे व पथकातील...
समर्थ पोलिसांची धडाकेबाज कारवाई; घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद, चोरीचे सोन्याचे दागिने हस्तगत
पुणे शहरातील घरफोडीच्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी समर्थ पोलीस स्टेशनने अत्यंत कौशल्यपूर्ण आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम कारवाई करत एका सराईत घरफोड्या गुन्हेगाराला जेरबंद केले आहे. दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी फिर्यादी यांच्या घरात अज्ञात आरोपीने प्रवेश करून सुमारे 90 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी केल्याची तक्रार समर्थ पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली होती. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत घरफोडीचा...
पुणे मनपा JE परीक्षा केंद्रांवर गोंधळ; उमेदवारांवर अन्यायकारक निर्णयाचा आरोप
पुणे महानगरपालिकेच्या ज्युनियर अभियंता (JE) पदासाठी 25 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या परीक्षेबाबत उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. राज्यातील बहुतांश स्पर्धा परीक्षा सुरक्षित, अधिकृत आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम असलेल्या TCS iON केंद्रांवर घेतल्या जात असताना, पुणे मनपाने ही महत्त्वाची परीक्षा अचानक कमी दर्जाच्या खाजगी केंद्रांवर घेण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप उमेदवारांकडून करण्यात येत आहे. उमेदवारांनी भरमसाठ परीक्षा शुल्क भरले असतानाही त्यांना परीक्षा...
ग्रँड टूरमुळे पुणेकरांची ‘ग्रँड’ कोंडी; वाहतूक नियोजन फसलं, नागरिकांचा संताप
पुणे शहरात मोठ्या दिमाखात आयोजित करण्यात आलेल्या ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेमुळे सोमवारी सामान्य पुणेकरांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. स्पर्धेच्या निमित्ताने करण्यात आलेल्या वाहतूक बदलांचे नियोजन अत्यंत ढिसाळ ठरल्याने शहरात अभूतपूर्व ट्रॅफिक जाम झाला. “हा रस्ता बंद, तो रस्ता बंद… मग आम्ही जायचं तरी कसं?” असा सवाल करत संतप्त पुणेकरांनी आपला राग व्यक्त केला. स्पर्धेसाठी शहरातील...




