महाराष्ट्र
पुणे मेट्रोमध्ये आजपासून एएफसी गेट्स ‘क्लोज्ड बाय डिफॉल्ट’; तिकीट स्कॅन केल्यावरच प्रवेश
पुणे : Pune Metro प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेसह शिस्तबद्ध प्रवास सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आजपासून सर्व मेट्रो स्थानकांवरील एएफसी (Automatic Fare Collection) गेट्स पूर्वस्थितीत उघडे न राहता बंद असतील. प्रवाशांनी तिकीट किंवा स्मार्ट कार्ड मशीनवर स्कॅन केल्यानंतरच हे दरवाजे उघडतील. यापूर्वी काही स्थानकांवर गेट्स अंशतः उघडे असत, मात्र नव्या प्रणालीमुळे केवळ वैध तिकीटधारकांनाच प्रवेश मिळणार आहे. हा बदल...
२०२६ कडे वाटचाल: पुण्याला मोठा दिलासा; बहुप्रतिक्षित हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो मार्ग मार्च २०२६ पर्यंत सुरू होण्याची शक्यता
पुणे | पुणे शहरात गेल्या काही वर्षांत खासगी वाहनांची संख्या झपाट्याने वाढली असून, अपुऱ्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमुळे वाहतूक कोंडी ही नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. तीन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या पुणे मेट्रोला अपेक्षित प्रतिसाद अद्याप मिळालेला नसला, तरी २०२६ हे वर्ष पुणे मेट्रोसाठी निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत. शहरातील सर्वात महत्त्वाचा आणि बहुप्रतिक्षित हिंजवडी ते शिवाजीनगर (मेट्रो लाईन-३) मार्ग मार्च २०२६...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते द्वितीय ग्रंथाचे भव्य विमोचन
नागपूर येथील विधान भवनात महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त एक अत्यंत गौरवशाली व ऐतिहासिक कार्यक्रम संपन्न झाला. या विशेष प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या शुभहस्ते‘विधानपरिषदेने संमत केलेली महत्त्वपूर्ण विधेयके, ठराव आणि धोरणे’ या द्वितीय ग्रंथाचे औपचारिक विमोचन करण्यात आले. हा ग्रंथ महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शंभर वर्षांच्या संसदीय वाटचालीतील विधिमंडळीय योगदान, लोकशाही मूल्ये आणि धोरणात्मक निर्णयांचा अमूल्य दस्तऐवज...
महाराष्ट्रातील पहिला अनोखा आणि धक्कादायक प्रकार : महिलेने चुकून गिळली संपूर्ण टूथब्रश, डॉक्टर आणि तज्ञांची दखल.
पुणे - पुण्यात एका ४० वर्षीय महिलेने चुकून संपूर्ण टूथब्रश गिळल्याची अनोखी घटना घडली आहे. ही घटना ऐकून डॉक्टर आणि तज्ञांनाही धक्का बसला असून, भारतभरातील वैद्यकीय क्षेत्रात या प्रकारावर चर्चा सुरू झाली आहे. ही घटना महाराष्ट्रातील पहिलीच नोंदलेली घटना असून, ती डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, पिंपरी-चिंचवड येथे नोंदवण्यात आली आहे. या दुर्मिळ घटनेविषयी अधिक माहिती देताना, डॉ. अभिजित कराड,...
मन सुन्न करणारी घटना: नव्या नोकरीच्या पहिल्याच दिवशी तरुणाचा झाड कोसळून मृत्यू
विक्रोळी | मुंबई | २८ मे २०२५ — मुसळधार पावसात विक्रोळीतील एका बागेत उभ्या असलेल्या झाडाखाली कोसळून तेजस नायडू या २६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. विशेष म्हणजे, तेजस याच दिवशी नवीन मल्टिनॅशनल कंपनीत नोकरीवर रुजू होणार होता. मात्र पावसामुळे त्याने नोकरीची सुरुवात एक दिवस लांबवली, आणि नियतीने त्याच दिवशी त्याच्यावर घाला घातला. एका क्षणात आयुष्य उद्ध्वस्त तेजस आपल्या मित्रांसोबत विक्रोळीतील...
नवी मुंबई: तळोज्यात भरधाव कारने पादचाऱ्यांना चिरडले; एका तरुणाचा मृत्यू, महिला गंभीर जखमी.
नवी मुंबईतील तळोजा भागात एका भरधाव कारने रस्त्यावर चालणाऱ्या पादचाऱ्यांना जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून, ४४ वर्षीय महिला गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात आज सकाळी १० वाजताच्या सुमारास घडला असून घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. मृत व्यक्तीचे नाव लालू दास (वय २७) असून, जखमी महिलेचे नाव प्रमिला दाश (वय ४४) असे...
निम्म्या वर्षाची चिंता मिटली! पवना धरणाने पार केली पन्नाशी; पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा, मावळातील गावांनाही पिण्याच्या पाण्याची खात्री
पिंपरी-चिंचवडसह मावळ तालुक्यातील नागरिकांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. पवना धरणात पाणीसाठा ५१.३४% इतका पोहोचल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. यामुळे शहर आणि परिसरातील निम्म्या वर्षाच्या पिण्याच्या पाण्याची चिंता दूर झाली आहे. मंगळवारी (२४ जून) सायंकाळी चार वाजता घेतलेल्या नोंदीनुसार, धरण परिसरात २४ तासात २६ मिमी इतका पाऊस झाल्याने पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. पावसाचा जोर आणि धरणातील वाढता साठा – गेल्या...
‘‘नराधमाला आमच्या ताब्यात द्या’’; आमदार महेश लांडगेंची थेट पोलीस ठाण्यात धडक!
पिंपरी-चिंचवडमध्ये एका धक्कादायक घटनेनंतर, आमदार महेश लांडगे यांनी थेट पोलीस ठाण्यात धडक मारत आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्याची मागणी केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. लांडगे यांनी या प्रकरणात पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करत, आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आमदार लांडगे यांनी स्पष्ट केले की, अशा नराधमांनी समाजात वावरायला नको, त्यांना...
पुणे ते नवी मुंबई विमानतळाच्या प्रवासाला गती; नवीन दुवा रस्ता वेळ ३० मिनिटांनी कमी करणार!
पुणे-मुंबई प्रवासाला नवी गती! पुणे: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर नवीन दुवा रस्त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रवास आणखी सोपा होणार आहे. एप्रिल २०२५ मध्ये उद्घाटन होणाऱ्या विमानतळासाठी प्रवास वेळ तब्बल ३० मिनिटांनी कमी होणार आहे. ९०% काम पूर्ण, प्रकल्प अंतिम टप्प्यात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) दिलेल्या माहितीनुसार, दुवा रस्त्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. जून २०२५ पर्यंत प्रकल्प पूर्ण होईल, असे...
“अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या संकटाचा मंत्रिमंडळात सखोल आढावा; मुख्यमंत्र्यांचे तातडीचे पंचनामे आणि मदतीचे निर्देश”
मुंबई — राज्यभरात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सखोल आढावा घेण्यात आला. शेती, घरे, रस्ते आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ पंचनामे करण्याचे आणि नुकसानग्रस्तांना त्वरीत भरपाई देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. अतिवृष्टीने राज्याला झोडपले राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सततच्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेतात उभ्या पिकांचे नुकसान,...













