महाराष्ट्र

Home महाराष्ट्र Page 204

ठाणे महापालिका महापौर–उपमहापौर निवडणुकीसाठी शिवसेना–महायुतीची ताकद दाखल; शर्मिला पिंपळोलकर व कृष्णा पाटील यांचे नामांकन

0

ठाणे : ठाणे महापालिकेच्या आगामी महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राजकीय हालचालींना वेग आला. महापौर पदासाठी सौ. शर्मिला पिंपळोलकर आणि उपमहापौर पदासाठी श्री. कृष्णा पाटील यांनी आज आपले नामांकन अर्ज अधिकृतपणे दाखल केले. या महत्त्वपूर्ण प्रसंगी शिवसेनेचे मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे साहेब स्वतः उपस्थित राहून उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. नामांकन प्रक्रियेच्या वेळी ठाणे महापालिका परिसरात...

सीआयएसएफ स्थापना दिनानिमित्त देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव; राष्ट्राच्या सुरक्षेत महत्त्वाची भूमिका

0

नवी दिल्ली : देशाच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक संस्थांचे संरक्षण करणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) स्थापना दिनानिमित्त देशभरातून जवानांना शुभेच्छा देण्यात आल्या. या निमित्ताने दलाच्या शौर्य, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठेचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. Central Industrial Security Force (CISF) हे देशातील प्रमुख केंद्रीय सुरक्षा दलांपैकी एक असून विमानतळ, मेट्रो रेल्वे, अणुऊर्जा केंद्रे, सरकारी इमारती, बंदरे तसेच विविध महत्त्वाच्या औद्योगिक...

ग क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने थेरगाव तसेट रहाटणी येथे उभारण्यात आलेल्या अनधिकृत मजल्यांच्या बांधकामांवर महानगरपालिकेची निष्कासनाची कारवाई.

0

पिंपरी, दि. १५ जुलै २०२५ : आयुक्त शेखर सिंह यांचे निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या अतिक्रमण कारवाईत थेरगाव व रहाटणी येथील महानगरपालिकेची परवानगी न घेता अनधिकृत पद्धतीने उभारण्यात आलेल्या मजल्यांचे तसेच पत्रा शेडचे  १३,३१५ चौरस फूट क्षेत्रफळ असलेली ८ अनधिकृत बांधकामे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने निष्कासनाची कारवाई करण्यात आली. थेरगाव येथील कारवाईमध्ये ग क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय...

ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने देशाने गमावला एक संयमी, सुसंस्कृत आणि दूरदर्शी नेता

0

ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील एक अढळ, संतुलित आणि मूल्यनिष्ठ व्यक्तिमत्त्व हरपले आहे. देशाच्या राजकीय, सामाजिक आणि संसदीय क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाचा पट अत्यंत व्यापक आणि प्रेरणादायी आहे. शांत, सौम्य वर्तन, विचारांची परिपक्वता आणि निर्णयक्षम नेतृत्व या त्यांच्या ओळखीच्या खास वैशिष्ट्यांनी त्यांना देशातील सर्वपक्षीय आदर प्राप्त करून दिला होता. आमदार, खासदार, महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष, लोकसभेचे...

पुणे पोलिसांची दोन्ही ठिकाणी मोठी कारवाई; विमानतळ आणि भारती विद्यापीठ परिसरात११ लाखांची संपत्ती जप्त

0

पुणे शहरातील विमानतळ पोलीस स्थानक आणि भारती विद्यापीठ परिसरात पोलिसांनी दोन्ही ठिकाणी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण १७ आरोपींना अटक करण्यात आली असून ११ लाख रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. या पुणे शहरात गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना मोठा यश मिळाले आहे. विमानतळ पोलीस स्थानकाच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३०५, ३३१(३) आणि ३३१(४) अंतर्गत एका...

बजाज पुणे ग्रँड टूर’ स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्वयंसेवकांचा सक्रिय सहभाग आवश्यक -जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

0

पुणे : ‘बजाज पुणे ग्रँड टूर 2026’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल स्पर्धेच्या माध्यमातून सायकलिंगला नवसंजीवनी देण्यासोबतच पुणे शहराची ‘सायकलींचे शहर’ म्हणून ओळख पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या स्पर्धेचे आयोजन 19 ते 23 जानेवारी 2026 या कालावधीत करण्यात येणार असून, ती यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील विद्यापीठे, महाविद्यालये, राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी), राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) यातील विद्यार्थी स्वयंसेवक व प्रेक्षक म्हणून मोठ्या संख्येने सहभागी व्हावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. पुणे जिल्हा प्रशासन, सायकलिंग फेडरेशन...

संतश्रेष्ठ ज्ञानोबारायांच्या पालखीचा भक्‍तीमय सोहळा सुरू! आषाढीवारी २०२५ मध्ये लाखो वारकऱ्यांचा जनसागर, भक्तिरसात न्हालेली महाराष्ट्राची माती

0

आळंदी (जि. पुणे) – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा २०२५ मध्ये अत्यंत भक्तिभावाने, शिस्तबद्धतेने आणि हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत निघाला आहे. महाराष्ट्राच्या भूमीतून निघालेला हा आषाढी वारीचा अखंड भक्तिरथ पुन्हा एकदा वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा आणि श्रद्धेची शिखरं गाठतो आहे. ज्ञानोबारायांची पालखी – भक्ती, परंपरा आणि शिस्त यांचं प्रतीक: वारकऱ्यांच्या टाळ-मृदुंगाच्या गजरात, "ज्ञानोबा-तुकाराम" च्या जयघोषात, ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदीहून पंढरपूरकडे मार्गस्थ...

सार्वजनिक गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडपांसाठी दिलासा – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

0

कल्याण – ठाणे, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली आणि अंबरनाथ महानगरपालिकांच्या हद्दीत सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मंडळांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे या मंडळांकडून मंडप परवानगीसाठी कोणताही शुल्क आकारला जाणार नाही. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सातत्यपूर्ण मागणीला यश मिळाले असून, नगरपालिकांनी हा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे. 🔸 निर्णयाचे महत्वगेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सव व नवरात्रोत्सव साजरे करणाऱ्या सार्वजनिक मंडळांना...

‘संत मुक्ताबाईंच्या तेजोविलीन दिनानिमित्त मुक्ताईनगरात लाखो भाविकांची अलौकिक मेजवानी; धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे महावस्त्र आणि पूजासाहित्य अर्पण

0

मुक्ताईनगर | प्रतिनिधी – "मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी, जननी देवाचीye ॥"मुक्ताई ही महाराष्ट्राच्या संत परंपरेतील तेजस्वी व्यक्तिमत्व. त्यांचा तेजोविलीन दिन उद्या मुक्ताईनगरात अत्यंत श्रद्धा, भक्तिभाव आणि आध्यात्मिक उत्साहात साजरा केला जाणार आहे. लाखो भाविक, वारकरी, संत-महंत, कीर्तनकार व आध्यात्मिक प्रवाहांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित राहणार असून मुक्ताईच्या चरणांमध्ये आपली नतमस्तक श्रद्धा अर्पण करणार आहेत. संत मुक्ताईंच्या तेजोविलीन दिनाचे औचित्य: संत ज्ञानेश्वर...

कल्याण गुन्हे शाखेची धडक कारवाई! ३ गावठी पिस्तुले, ३ जिवंत काडतुसे आणि घातक शस्त्रे जप्त — सराईत गुन्हेगार जेरबंद

0

कल्याण गुन्हे शाखा युनिट-03 ने नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत आणखी एक मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ३ गावठी पिस्तुले, ३ जिवंत काडतुसे आणि अन्य घातक शस्त्रे जप्त करण्यात आली असून, सराईत गुन्हेगाराला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई कल्याण परिसरातील वाढत्या बेकायदेशीर शस्त्रप्रकरणांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. पोलिसांनी अत्यंत गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचला आणि...

Copyright ©