Breaking News
अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाला उडवून देण्याची धमकी; सकाळी मेल प्राप्त, सहा मजली इमारतीची सखोल तपासणी
हिल्यानगर : अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाला उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल आज सकाळी सुमारे नऊ वाजता प्राप्त झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. या गंभीर धमकीनंतर तात्काळ प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. धमकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही धोका टाळण्यासाठी दोन स्वतंत्र बॉम्बशोधक व नाशक पथकांद्वारे (BDDS) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहा मजली इमारतीची सखोल...
*पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित महात्मा जोतीराव फुले स्मृतीदिन प्रबोधन कार्यक्रमास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद…*
समाजातील प्रत्येकाला सर्वत्र समान वागणूक, समान शिक्षण हा विचार घेऊन महात्मा जोतीराव फुले यांनी आयुष्यभर कार्य केले तर त्यांच्या या विचारधारेचा वारसा पुढे घेऊन जाण्याचे काम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. महात्मा फुले यांचा सर्वांना समान संधीचा, समान शिक्षणाचा विचार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात मांडला असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व विद्यापीठ अनुदान आयोग माजी अध्यक्ष डॉ....
शेकडो दिव्यांग बांधवांनी घेतली मतदानाची शपथ आणि १००% मतदान करण्याचा केला निर्धार…
पिंपरी : “आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून,याद्वारे प्रतिज्ञा करतो की,आम्ही आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निःपक्षपाती आणि शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता, किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू,” अशी शपथ दिव्यांग बांधवांनी अतिरिक्त आयुक्त तथा स्वीप व्यवस्थापन प्रमुख तृप्ती सांडभोर यांच्या उपस्थितीत घेऊन येत्या महानगरपालिका निवडणुकीत १०० टक्के मतदान...
शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांच्या गाडीला अपघात, सुदैवाने मोठी हानी टळली
मुंबई: शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांच्या गाडीला काल रात्री जोगेश्वरी येथे ट्रकने धडक दिल्याची घटना घडली. या भीषण अपघातामुळे काही काळ मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. सुदैवाने, या घटनेत खासदार वायकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही, मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शिवसेना खासदार रवींद्र वायकर हे त्यांच्या गाडीने प्रवास करत असताना जोगेश्वरी येथे एका ट्रकने...
कोलकात्यात धक्कादायक प्रकार! इस्लामीवाद्यांकडून बस चालकाला भगवा ध्वज काढण्यास भाग पाडल्याचा आरोप
कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये हिंदू संस्कृतीवर हल्ले होत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अलीकडेच कोलकात्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, जिथे काही कट्टर इस्लामी गटांवर बस चालकाला भगवा ध्वज काढण्यास जबरदस्ती केल्याचा आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे, ही घटना पोलिसांच्या उपस्थितीत घडली असल्याचे सांगितले जात आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. काय घडले नेमके?मिळालेल्या माहितीनुसार,...
पुणे : कोंढवा बलात्कार प्रकरणात धक्कादायक वळण – आरोपी पीडितेला परिचित; सेल्फी तिच्या संमतीने घेतले, फोटो संपादित; रसायन फवारल्याचे पुरावे नाहीत!
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची पत्रकार परिषदेत माहिती – प्राथमिक तपासात मोठा खुलासा पुणे – कोंढवा परिसरात घडलेल्या २२ वर्षीय आयटी महिला व्यावसायिकावर कथित बलात्कार प्रकरणात पुणे पोलिसांच्या प्राथमिक तपासात धक्कादायक वळण समोर आले आहे. पीडित महिला आणि आरोपी पूर्वीपासून एकमेकांना ओळखत होते, आणि फोटो तिच्या संमतीने काढण्यात आला असून, तो नंतर संपादित करण्यात आल्याचे पोलिस तपासातून स्पष्ट झाले आहे. गंभीर...
“दिवाळीचा उत्साह महाराष्ट्रात शिगेला, पण किंमतींमुळे खरेदीवर मर्यादा; बाजारपेठांत नागरिकांची गर्दी मात्र कायम!”
दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील बाजारपेठा ग्राहकांनी फुलून गेल्या आहेत. पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक या ठिकाणच्या बाजारात दिवाळीच्या खरेदीसाठी कपडे, मिठाई, आकाशकंदील, फटाके, भांडी, आभूषणे यांसारख्या वस्तूंवर नागरिकांची विशेष मागणी दिसून येत आहे. परंतु, मागील काही महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तूंसह दिवाळीतील अन्य सामग्रीच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सामान्य ग्राहकांच्या खरेदीवर परिणाम झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. कपडे, सोने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू,...
पिंपरी प्रभाग क्रमांक २१ मधून भाजपच्या उषाताई वाघेरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल; कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद
पिंपरी, पुणे : पिंपरी गाव, अशोक थिएटर, जिजामाता हॉस्पिटल परिसराचा समावेश असलेल्या प्रभाग क्रमांक २१ मधून भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार म्हणून उषाताई संजोग वाघेरे पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज आज अधिकृतरीत्या दाखल केला. अर्ज दाखल करताना परिसरात उत्साहाचे वातावरण होते. भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी उषाताई वाघेरे यांना पाठिंबा दर्शवला. उषाताई...
‘पर्पल जल्लोष – दिव्यांगांचा महाउत्सव’: पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अनोखा उपक्रम
‘पर्पल जल्लोष - दिव्यांगांचा महाउत्सव’ हा तीन दिवसीय कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयातून काम करावे, कार्यक्रमात उपस्थित दिव्यांग बांधव, नागरिक, लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांना कोणत्याही सोयीसुविधांची कमतरता भासणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच या कार्यक्रमात दिव्यांग बांधव आणि सामाजिक संस्थांचा सहभाग वाढविण्यावर भर द्यावा, अशा सूचना आयुक्त शेखर सिंह यांनी आज दिल्या. १७ ते १९ जानेवारी २०२५ या कालावधीत दिव्यांग बांधवांसाठी महापालिकेच्या वतीने पर्पल जल्लोष तथा उत्सव...















