मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला जागतिक गुंतवणुकीचे “मॅग्नेटिक महाराष्ट्र” प्रदर्शन यश
दावोस, २२ जानेवारी:
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने ६,२५,४५७ कोटी रुपयांच्या भव्य गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धडाडीच्या नेतृत्वामुळे महाराष्ट्र हा गुंतवणुकीसाठी सर्वाधिक आकर्षण ठरणारा राज्य बनला आहे. दावोस येथे सुरु असलेल्या या जागतिक मंचावर महाराष्ट्राचे “मॅग्नेटिक महाराष्ट्र” पॅव्हेलियन हे प्रमुख चर्चेचा विषय ठरले आहे.
प्रमुख गुंतवणुकीची वैशिष्ट्ये:
-
टाटा समूह: टाटा समूहाने ३०,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. ही गुंतवणूक आयटी, ऑटोमोबाईल आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
-
रिन्यू पॉवर: बीड जिल्ह्यात १५,००० मेवॅट पवनऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी तयारी.
-
लुलू समूह: नागपूरसह महाराष्ट्रात विस्तार करण्याचे ठरवले.
-
काल्सबर्ग समूह: अल्कोहोलिक पेय क्षेत्रात महाराष्ट्रात गुंतवणुकीची तयारी.
-
कॉग्निझंट: आयटी आणि डेटा अॅनालिटिक्स क्षेत्रात मोठ्या प्रमाणात योगदान देण्याची तयारी.





