Home Breaking News भोसरीतील मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी आमदार महेश लांडगे यांची ग्वाही; विविध योजना आणि...

भोसरीतील मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी आमदार महेश लांडगे यांची ग्वाही; विविध योजना आणि प्रकल्पांद्वारे संपूर्ण समाजाचा उन्नतीसाठी प्रयत्न

भोसरी विधानसभेतील मागासवर्गीय समाजाच्या प्रगतीसाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि विद्यमान आमदार महेश लांडगे यांनी विशेष आश्वासन दिले आहे. मतदारसंघातील मातंग आणि इतर मागासवर्गीय समाजाच्या मागण्यांसाठी विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ते कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. भोसरीतील मागासवर्गीय प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच पार पडली, ज्यामध्ये विविध समाजसेवक, माजी नगरसेविका, आणि ४०० हून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार अमित गोरखे यांनी महेश लांडगे यांच्या कार्याचे कौतुक करत सांगितले की, “भोसरीत स्थायी समितीच्या अध्यक्ष असताना लांडगे यांनी संविधान भवन उभारून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मोठी श्रद्धांजली दिली आहे.” यासोबतच, त्यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी निगडी येथे ठिकाण निश्चित केले. दरवर्षी साठे जयंती महोत्सवाला मनपाकडून मोठे अनुदान मिळवून देण्याचे काम त्यांनी केलं आहे.

लांडगे यांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आरटीई अंतर्गत मोफत प्रवेशाचा लाभ दिला आहे. तसेच, पंतप्रधान आवास योजना, घरकुल योजना, आणि एसआरए प्रकल्पांतर्गत मागासवर्गीय जनतेला घर मिळवून देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. नुकत्याच झालेल्या बैठकीत घरकुल अनुदानाची मर्यादा दीड लाखांवरून अडीच लाखांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला, ज्याचा फायदा समाजातील अनेक गरजू कुटुंबांना होणार आहे.

याव्यतिरिक्त, लंडनमध्ये असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानाचे आणि पुण्यातील लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक उभारण्याच्या महायुती सरकारच्या योजनांना मागासवर्गीय समाजाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. लांडगे यांच्या कार्याचा ठसा आगामी निवडणुकीतही दिसेल, असे मत अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.