Home Breaking News आशियाई बेंच प्रेस स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेल्या सेजल मोईकरचा सन्मान; इंद्रायणी विद्या मंदिर...

आशियाई बेंच प्रेस स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेल्या सेजल मोईकरचा सन्मान; इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेकडून ५१ हजारांचा धनादेश प्रदान.

मावळ तालुक्याच्या सुवर्ण कन्या सेजल मोईकरचा गौरव करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये पार पडलेल्या आशियाई बेंच प्रेस स्पर्धेत ७६ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावून सेजलने मावळ तालुक्याचे नाव जागतिक स्तरावर उंचावले आहे. सुधावडीसारख्या छोट्या गावातून आणि शेतकरी कुटुंबातून आलेल्या सेजल मोईकरने हा यशाचा सोपान गाठल्याने तिचा हा संघर्ष आणि जिद्द प्रेरणादायी आहे.

सेजल ही, ला फिटनेस जिमची खेळाडू असून, ती इंद्रायणी महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिच्या या यशामागे इंद्रायणी जिमचे प्रशिक्षक नितीन म्हाळसकर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी माळघे यांचे मार्गदर्शन लाभले.

आशियाई स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडू म्हणून देखील सेजल मोईकरचा सन्मान करण्यात आला आहे. यासंदर्भात इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी सेजलचा ५१ हजार रुपयांचा धनादेश देऊन सत्कार केला आणि तिच्या उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या.