Home Breaking News प्रसाद गोसावी यांच्या पराक्रमाला सलाम: निधनानंतरही धडकतंय पत्रकाराचा हृदय; जवानाला दिलं नवं...

प्रसाद गोसावी यांच्या पराक्रमाला सलाम: निधनानंतरही धडकतंय पत्रकाराचा हृदय; जवानाला दिलं नवं जीवन.

Along with the heart, two lungs, liver, one kidney and two eyes were also donated.

पुणे :पोलिसनामा या वृत्तसंकेतस्थळाचे वरिष्ठ प्रतिनिधी प्रसाद गजानन गोसावी यांचे दु:खद निधन झाले. दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या गंभीर अपघातामुळे प्रसाद यांच्यावर निगडी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दुर्दैवाने, मृत्यूवर मात करणार असं वाटत असतानाच प्रसाद यांची अखेरची श्वास घेतली. मात्र, त्यांच्या निधनानंतर त्यांच्या अवयवदानाच्या निर्णयामुळे, प्रसाद गोसावी हे अवयवदान करणारे पहिले पत्रकार ठरले आहेत.

प्रसाद गोसावी यांच्या मृत्यूनंतर काही तासांतच, त्यांचं हृदय पुण्यातील सदर्न कमांड रुग्णालयात नेण्यात आलं आणि तिथे एका जवानाच्या शरीरात यशस्वीरीत्या प्रत्यारोपण करण्यात आलं. त्यामुळे प्रसाद यांची मृत्यूशी झालेली लढाई असफल झाली असली तरी त्यांचं हृदय अजूनही धडधडतंय. त्यांच्या हृदयासोबतच दोन फुफ्फुसे, यकृत, एक मूत्रपिंड आणि दोन डोळेही दान करण्यात आले. यामुळे एकूण पाच रुग्णांना नवजीवन मिळालं आहे.

Within hours of Prasad Gosavi’s death, his heart was taken to Pune’s Southern Command Hospital where a heart transplant was successfully performed on a jawan.

प्रसाद गोसावी यांचा ऑफिसमधून घरी जात असताना खडकी रेल्वे स्थानकाजवळ दुचाकी अपघात झाला होता. त्यांना निगडी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या अपघातात त्यांना गंभीर डोक्याचा आणि पायाचा मार बसला होता. डॉक्टरांसमोर त्यांचा जीव वाचवण्याचं आव्हान होतं. उपचारादरम्यान पायाचा संवेदनाशून्यता वाढल्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्या उजव्या पायाचा कापण्याचा निर्णय घेतला, कारण त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. काही काळ त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती, मात्र अचानक मेंदूतील रक्तस्त्रावामुळे ते कोमात गेले.

अवयवदानाचा निर्णय डॉक्टरांनी भरपूर प्रयत्न केले तरीही प्रसाद यांच्या स्थितीत सुधारणा होत नव्हती. अखेर डॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेड घोषित केलं. या दु:खद वार्तेने प्रसाद यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. तरीही, या कठीण प्रसंगातही त्यांनी प्रसाद यांचे अवयव दान करण्याचा महान निर्णय घेतला. त्यांच्या डोळ्यांसोबतच हृदय, दोन फुफ्फुसे, यकृत आणि मूत्रपिंड काढण्यात आले.

जवानाला दिलं हृदय प्रसाद यांच्या हृदयाला पुण्याच्या सदर्न कमांड रुग्णालयात पोहोचवण्यासाठी पिंपरी ते पुणे हा हिरवा मार्ग (ग्रीन कॉरिडॉर) तयार करण्यात आला. पोलिस आणि सैन्यदलाच्या सुरक्षेच्या अंतर्गत हे हृदय पुण्याकडे नेण्यात आलं. डीवाय पाटील रुग्णालयातील सर्व डॉक्टर आणि कर्मचार्‍यांनी प्रसाद यांना सलाम केला. त्यांच्या मृत्यूनंतर काही तासांतच त्यांचं हृदय पुण्याच्या सदर्न कमांड रुग्णालयात एका जवानाच्या शरीरात प्रत्यारोपित करण्यात आलं. अवयवदानाच्या प्रक्रियेनंतर, प्रसाद यांच्या पार्थिवावर त्यांच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत निगडी स्मशानभूमीत शोकमय वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

आज प्रसाद या जगात नसले तरी त्यांच्या हृदयाची धडधड अजूनही सुरू आहे. भविष्यात त्यांच्याच डोळ्यांतून हा जग पाहिला जाईल. यकृत, फुफ्फुसे, आणि मूत्रपिंड मिळाल्यामुळे संबंधित रुग्णांना नवजीवन प्राप्त झालं आहे. प्रसाद गोसावी यांच्या निधनानंतर केलेल्या या महान कार्यामुळे त्यांचे नाव कायमस्वरूपी अवयवदान करणारे पहिले पत्रकार म्हणून स्मरणात राहील.