Home Breaking News चिंचवड: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात खळबळ; तीन वरिष्ठ निरीक्षक तडकाफडकी नियंत्रण कक्षाशी संलग्न.

चिंचवड: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात खळबळ; तीन वरिष्ठ निरीक्षक तडकाफडकी नियंत्रण कक्षाशी संलग्न.

Three senior inspectors are attached to the emergency control room.

चिंचवड: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना अचानक नियंत्रण कक्षाशी संलग्न केल्याने खळबळ उडाली आहे. या तडकाफडकी निर्णयामुळे पोलीस दलात चर्चेला उधाण आले आहे.


चिंचवड: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना तडकाफडकी नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले आहे. या बदल्यांचे आदेश पोलीस उपायुक्त माधुरी कांगणे यांनी जारी केले आहेत.

चिंचवड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र कोळी, दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ, आणि तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अंकुश बांगर यांना या बदल्यांचा फटका बसला आहे. या बदल्यांमागील कारणे विविध असल्याचे सांगितले जात आहे.

काही दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांचे दप्तरी अमोल जाधव याला अटक केली होती. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर ढमाळ यांची बदली करण्यात आल्याचे बोलले जात आहे. तसेच, चिंचवड आणि तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध धंद्यांवर करण्यात आलेल्या कारवाईमुळे अंकुश बांगर आणि जितेंद्र कोळी यांना नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

या अचानक झालेल्या बदल्यांमुळे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात मोठी खळबळ उडाली आहे.