Home Breaking News नवी मुंबईत अनधिकृत हॉटेल्स, बार आणि हुक्का पार्लर्सवर धडक कारवाई; ४१ प्रतिष्ठाने...

नवी मुंबईत अनधिकृत हॉटेल्स, बार आणि हुक्का पार्लर्सवर धडक कारवाई; ४१ प्रतिष्ठाने सील, मुख्यमंत्री शिंदेंच्या आदेशाची कडक अंमलबजावणी

125
0

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे, ठाणे, मुंबई आणि आता नवी मुंबईतील अनधिकृत व वाढीव बांधकाम करणाऱ्या हॉटेल, बार, रेस्टॉरंट आणि मध्यरात्री चालणाऱ्या लेडीज बारवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यानुसार, नवी मुंबईतील अनधिकृत पब, लॉज, हुक्का पार्लरवर आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाई केली.

अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या नियंत्रणाखाली, ज्यांनी अनधिकृत बांधकाम केले आहे तसेच मार्जिनल स्पेसचा गैरवापर केला आहे अशा ४१ हॉटेल, बार, पब, हुक्का पार्लरवर कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान, आयुक्त डॉ. कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी उपआयुक्त डॉ. राहुल गेठे यांच्यासह कारवाईच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

बेलापूर विभाग क्षेत्रातील हॉटेल/बार/पब/हुक्का पार्लर:

(१). VIP
(२). धूम रात्री
(३). नाईट एंगल
(४). कबाना
(५). बेबो
(६). स्टारी नाईट.(बेलापूर विभागातील हॉटेल्स)
(७). लक्ष्मी हॉटेल,
(८). महेश हॉटेल
(९). अश्विथ हॉटेल
(१०). स्पाइस ऑफ शेड
(११). घाटी अड्डा
(१२). ब्रू हाउस कॅफे
(१३). रूड लॉन्च
(१४). इनव्हिटेशन हॉटेल
(१५). क्षमा
(१६). कॅफे नाईटिन
(१७). बार मंत्रालय
(१८). बार स्टॉक एक्सचेंज
(१९). नॉर्दन स्पाइसेस
(२०). कॉफी बाय डी बेला
(२१). द लव्ह आणि लाटे
(२२). सुवर्ड्स कॅफे
(२३). मालवण तडका

नेरुळ विभाग क्षेत्रातील:

१. साई दरबार, सेक्टर ०२ नेरुळ
२. भारती बार, सेक्टर ०१ शिरवणे
३. गंगा सागर लॉज, सीएनजी पंपाजवळ, सेक्टर १३
४. सिल्व्हर पॅलेस, सेक्टर १३
५. शानदार हुक्का पार्लर, सेक्टर ०१ शिरवणे
६. सत्यम लॉज, सेक्टर ०१ शिरवणे

वाशी विभाग क्षेत्रातील:

१. हॉटेल गोल्डन सुट्स, वाशी प्लाझा, सेक्टर १७
२. टेरेझा, वाशी प्लाझा, सेक्टर १७
३. अंबर रेस्टॉरंट आणि बार, वाशी प्लाझा, सेक्टर १७

कोपरखैरणे क्षेत्रातील:

१. आदर्श बार, सेक्टर १ए, कोपरखैरणे

घणसोली क्षेत्रातील:

१. एम. एच-४३ रेस्टॉरंट अॅन्ड बार, सेक्टर ०९, घणसोली
२. मोनार्क रेस्टॉरंट व बार, ठाणे-बेलापूर रोड, रबाळे एम.आय.डी.सी.
३. साई इन लॉजचे छोट्या आकाराचे विदयुत होर्डीग
४. सीएनजी पंपाचे अनधिकृत होर्डीग
५. मल्लिका बार व रेस्टॉरंट यांनी उभारलेले पत्र्याचे शेड व विदयुत होर्डीग
६. मिड लँड हॉटेल रेस्टॉरंट व बार, सेक्टर ०३ यांनी उभारलेले बांबूचे पक्के शेड

ऐरोली क्षेत्रातील:

१. सेक्टर- १ ऐरोली येथील अनधिकृत व्यवसाय करत असलेले बांबूचे/ताडपत्रीचे शेड
२. ऐरोली नाका येथील चायनिज स्टॉल
३. सेक्टर १९ येथील कृष्णा रेस्टॉरंट यांनी उभारलेले बांबूचे शेड

अशा प्रकारे, बेलापुर कार्यक्षेत्रातील २३, नेरुळ कार्यक्षेत्रातील ६, वाशी कार्यक्षेत्रातील ३, कोपरखैरणे कार्यक्षेत्रातील १, घणसोली कार्यक्षेत्रातील ५ आणि ऐरोली कार्यक्षेत्रातील ३ अनधिकृत व वाढीव बांधकाम करणाऱ्या हॉटेल, बार, रेस्टॉरंट, लेडीज बार, पब, लॉज, हुक्का पार्लरवर कारवाई करण्यात आली. ज्या व्यावसायिक आस्थापनांनी अनधिकृत बांधकाम केले आहे आणि मार्जिनल स्पेसचा गैरवापर केला आहे अशा आस्थापनांवर सुरू केलेली कारवाई यापुढेही कायम राहील.