पुण्यातील एफसी रोडवरील एल३ हॉटेलमधील ड्रग पार्टी शहरभर चर्चेत आली आहे. पोलिस आणि उत्पादन शुल्क विभाग या प्रकरणात कारवाई करत असताना, पुणे महापालिकेने एफसी रोडवरील अतिक्रमण केलेल्या बार आणि पब्सवरही हातोडा उगारला आहे.
पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सध्या एफसी रोडवरील अनेक अतिक्रमित आस्थापनांवर कारवाई सुरू केली आहे. या दरम्यान, एल३ बारवरही यावेळी कारवाई होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही वर्षांत एफसी रोडवरील अनेक हॉटेल्सनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे अतिक्रमण काढले.
