करोडो भारतीयांचं आणि अनेक पिढ्यांचं, राममंदिराचं स्वप्न पूर्ण झालं, त्यात मोलाचा वाटा हा अडवाणीजींचाच, आणि हे करताना त्यांनी स्वतःची राजकीय कारकीर्द पणाला लावली. राजकीय अस्पृश्यता आणि उपेक्षा सहन केली. रथयात्रेतून अडवाणीजींनी देशातील हिंदूंची अस्मिता जागृत केली आणि भारतीय जनता पक्षाचा उदय झाला, पण हे करताना ‘अब की बारी अटलबिहारी’ म्हणण्याइतका मनाचा मोठेपणा हा अडवाणीजींकडे होता, असंही राज यांनी म्हटलं आहे. देशाच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून आजपर्यंतच राजकारण पाहिलेले आणि देशातील राजकारणाला वळण देणाऱ्या ह्या ज्येष्ठ नेत्याचं ह्या सर्वोच्च नागरी सन्मानासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनापासून अभिनंदन, असं राज यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.लालकृष्ण अडवाणी ( नोव्हेंबर ८, इ.स. १९२७) हे भाजपाचे नेते आहेत. ते सुरुवातीच्या काळात भारतीय जनसंघाचे नेते होते आणि इ.स. १९७४ मध्ये राज्यसभेवर निवडून गेले.त्यांना आणीबाणीच्या दरम्यान कारावास घडला. इ.स. १९७७ मध्ये जनसंघ जनता पक्षात विलीन झाल्यानंतर ते जनता पक्षात सामील झाले तर इ.स. १९८० मध्ये पूर्वाश्रमीच्या जनसंघाच्या नेत्यांनी जनता पक्षातून बाहेर पडून भारतीय जनता पक्षाची स्थापना केल्यानंतर ते त्या पक्षात सामील झाले. ते इ.स. १९८९ पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य होते.भारताचे माहिती आणि प्रसारणमंत्री तर इ.स. १९९८ ते इ.स. २००४ या काळात भारताचे गृहमंत्री होते. तसेच ते इ.स. २००२ ते इ.स. २००४ या काळात भारताचे उपपंतप्रधान होते.ते इ.स. १९८९ आणि इ.स. १९९१च्या लोकसभा निवडणुकींमध्ये नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. इ.स. १९९१च्या निवडणुकींमध्ये त्यांनी गुजरात राज्यातील गांधीनगर लोकसभा मतदारसंघातूनही विजय मिळवला होता.त्यामुळे त्यांनी नवी दिल्ली मतदारसंघाच्या खासदारपदाचा राजीनामा दिला. जैन हवाला प्रकरणात त्यांच्याविरूद्ध आरोपपत्र दाखल झाल्यामुळे त्यांनी इ.स. १९९६ची लोकसभा निवडणुक लढवली नाही. त्यानंतर ते इ.स. १९९८, इ.स. १९९९, इ.स. २००४ आणि इ.स. २००९च्या निवडणुकींमध्ये गुजरात राज्यातील गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले.ते इ.स. १९९० ते इ.स. १९९३ दरम्यान आणि इ.स. २००४ पासून लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत.ते इ.स. १९८६ ते इ.स. १९९०, इ.स. १९९३ ते इ.स. १९९८ आणि इ.स. २००४ ते इ.स. २००५ या काळात भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते.भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापर्यंत प्रत्येकाने अडवाणी यांना भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. योग्य व्यक्तीचा सन्मान झाल्याचं या दिग्गजांनी म्हटलं आहे.