येत्या गुरुवारी २३ नोव्हेंबर २०२३ रोजी साजरा होत असलेला कार्तिकी यात्रा एकादशीचा सोहळा साजरा संपूर्ण होत आहे. त्यामुळे संताचे लहान मोठे पालखी सोहळे पंढरपूरनजीक दाखल झाले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना सकल मराठा समाजाने देखील या कार्तिकी एकादशीला शासकीय महापूजेत उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा करण्यावरून विरोध केल्याने मोठा वाद निर्माण होण्याची शक्यया निर्माण झाली आहे. यादरम्यान मराठा सकल समाजाच्या आंदोलकांनी जिल्हा प्रशासनाच्या प्रमुख म्ह्णून जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद ह्यांच्या समोर पाच प्रमुख मागण्या केल्या होत्या. यावर, काल जिल्हा प्रशासनाने सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून समाजाच्या पाचही मागणी मान्य केल्याने मराठा समाजाने आंदोलन मागे घेत असल्याचे सूचित केले आहे . त्यामुळे आता उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय महापूजेतील सहभागाचा मार्ग मोकळा झाला आहे.येथील आलेल्या लहान मोठ्या दिंडी पालख्या सोहळ्यातील जमलेल्या भाविकांसाठी मंदिराच्या नजीक 65 एकरात रहाव्याची व लागणाऱ्या आवश्यक त्या सर्व गरजू सुविधा उपलब्ध करून देण्यात आलायचे माहिती येथील प्रांतधिकारी गजानन गुरव यांनी दिली आहे.
Home Breaking News येत्या कार्तिकी एकादशीला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस ह्यांच्या हस्ते महापूजा होणार...