मुंबई – महानगरपालिका (BMC) कडून मुंबईतील आर/दक्षिण विभाग (कांदिवली पूर्व व पश्चिम) येथे 21 एप्रिल ते 26 एप्रिल 2025 या कालावधीत झाडांची छाटणी मोहीम (Tree Trimming Drive) राबवण्यात येणार असल्याची माहिती अधिकृत X (पूर्वीचं ट्विटर) अकाऊंटवरून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
BMC च्या वतीने करण्यात आलेल्या पोस्टमध्ये नागरिकांना सहकार्याचे आवाहन करताना सांगण्यात आले आहे की, “झाडांच्या छाटणीच्या वेळेत संबंधित रस्त्यांवर वाहनं पार्क करू नयेत, अन्यथा कामात अडथळा येईल आणि सुरक्षेच्या दृष्टीनेही धोका निर्माण होईल.”
मुंबई शहरातील झाडांची निगा राखणे, सार्वजनिक रस्त्यांवरील साफसफाई आणि पावसाळ्याच्या तयारीचा भाग म्हणून ही मोहीम घेतली जात आहे.
कांदिवली पश्चिममध्ये छाटणीसाठी निश्चित करण्यात आलेले रस्ते:
-
त्रिकमदास रोड (Trikamdas Road)
-
बंडर पाखाडी रोड (Bunder Pakhadi Road)
-
शांतिलाल मोदी रोड (Shantilal Modi Road)
कांदिवली पूर्वमध्ये छाटणीसाठी निश्चित करण्यात आलेले रस्ते:
-
कॉर्पोरेशन बँक रोड (Corporation Bank Road)
-
सफायर हाइट्स रोड (Suffire Height Road)
-
ठाकूर स्टेडियम रोड (Thakur Stadium Road)
-
ठाकूर व्हिलेज (Thakur Village)






