Home Breaking News ड्रग्स माफिया ललित पाटील ह्याला पलायन होण्यात कसूरवार पुणे पोलीस दलातील दोन...

ड्रग्स माफिया ललित पाटील ह्याला पलायन होण्यात कसूरवार पुणे पोलीस दलातील दोन पोलीसांना आटक ❗

ससून हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असताना ड्रग्स रॅकेट चा मोहरक्या ललित पाटील पोलीसना हातावर तुरी देऊन पलायन करून गेला असता त्या वेळी कर्तव्यदक्ष मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी ह्यांना गुन्हे शाखा युनिट 2 च्या पोलिसांनी आटक केली आहे त्यामुळे पुणे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. ह्या बाबतीत अधिक माहिती अशी आहे कि ससून रुग्णालय येथून उपचार घेताना ललित पाटील ह्यांनी पलायन केले होते त्याच्या शोधासाठी पूर्ण पुणे पोलिस यंत्रणा नि कंबर कसली होती अखेर मुंबई येथील साकीनाका पोलीस दलातील अधिकारी ह्यांनी त्यांच्या खबरी च्या माहिती अनुसार डुग्स माफिया ललित पाटील परराज्यातून पलायन करण्याच्या तयारीत असताना त्याला आटक केली व त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली असता. न्यालयच्या परवानगीने ललित पाटील ह्याला पुणे पोलिसानी ताब्यात घेऊन पुण्यात आणले.त्यानंतर त्याला पुन्हा न्यालयात हाजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावली व त्या चौकशी दरम्यान त्याच्या नाशिक च्या घराची झाडा झडती घेतली असता त्याच्या घरी कोट्यावधी रुपये चे सोनं आढळून आले ते पुणे पोलीसानी जप्त केले.ज्या दिवशी ललित पाटील ससून रुग्णालयातून पलायन केले होते त्या दिवशी ललित पाटील ह्याच्या बंदोबस्तावर पोलीस कर्मचारी श्री नाथाराम काळे आणि श्री अमित जाधव या मुख्यालयातील कोर्ट कंपनीच्या पोलीसांना गुन्हे शाखेचे युनिट -2 ने आटक केली आहे कारण असे कि त्या दिवशी हे कर्मचारी ड्युटी वर असताना हा असा प्रकार घडला, ड्युटी वर असताना ह्या कर्मचारांनी कर्तव्यकसुर व निष्काळजीपणा दाखवल्या बदल त्याना आटक केली असल्याचे माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारीनी दिली