ठाणे जिल्ह्यातील Badlapur येथे मुली व महिलांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर आज कुळगाव बदलापूर नगर परिषदेत वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. अलीकडील काही घटनांबरोबरच नुकत्याच उघडकीस आलेल्या अवैध स्त्रीबीज विक्री प्रकरणाचा सविस्तर आढावा या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीस कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, उपनगराध्यक्षा प्रियंका दामले, मुख्याधिकारी मारुती गायकवाड, पोलीस उपायुक्त सचिन गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे, ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार तसेच संबंधित प्रकरणाचे तपास अधिकारी उपस्थित होते. विविध विभागांमधील अधिकाऱ्यांनीही आपापल्या विभागाचा आढावा सादर केला.
झपाट्याने वाढणारे शहर, वाढत्या समस्या
Mumbai Metropolitan Region (एमएमआर) चा भाग असलेल्या बदलापूरची लोकसंख्या सुमारे पाच लाखांच्या घरात पोहोचली आहे. गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झाल्यामुळे सामाजिक आणि प्रशासकीय आव्हाने समोर आली आहेत. अनधिकृत प्री-स्कूल्स, विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांकडे आवश्यक परवानग्यांचा अभाव, बेकायदेशीर लहान रुग्णालये आणि समुपदेशन केंद्रांची कमतरता यावर गंभीर चर्चा करण्यात आली.
तातडीच्या कारवाईचे आदेश
-
शिक्षण विभागाची परवानगी नसलेल्या प्री-स्कूल्सची तपासणी
-
विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची परवाना व सुरक्षेची पडताळणी
-
खाजगी सोनोग्राफी केंद्रांची तपासणी
-
अनधिकृत रुग्णालयांवर कारवाई
-
महिला आणि बालकांसाठी समुपदेशन केंद्रे सुरू करणे
या सर्व बाबी तातडीने हाती घेण्याचे निर्देश शिक्षण, आरोग्य व पोलीस विभागाला देण्यात आले. नगर परिषद प्रशासनाने आवश्यक ठराव मंजूर करून महिला व मुलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, असे स्पष्ट करण्यात आले.
संरक्षण अधिकारी आणि समुपदेशन केंद्राची गरज






