Home Breaking News सह्याद्री अतिथीगृहात सौहार्दपूर्ण भेट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी सरन्यायाधीश भूषण गवईजी...

सह्याद्री अतिथीगृहात सौहार्दपूर्ण भेट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी सरन्यायाधीश भूषण गवईजी यांच्याशी संवाद

41
0
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे देशाचे माजी सरन्यायाधीश मा. भूषण गवईजी यांनी सदिच्छा भेट घेतली. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अत्यंत आपुलकीने स्वागत केले.
ही भेट अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली. न्यायव्यवस्था, लोकशाही मूल्ये, संविधानाची महत्ता तसेच देशाच्या प्रगतीतील न्यायसंस्थेची भूमिका यासंदर्भात दोन्ही मान्यवरांमध्ये विचारांची देवाणघेवाण झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी भूषण गवईजी यांच्या प्रदीर्घ व उल्लेखनीय न्यायिक कारकिर्दीबद्दल गौरवोद्गार काढले.
मा. भूषण गवईजी यांनीही राज्याच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत समाधान व्यक्त केले. महाराष्ट्रातील सुशासन, प्रशासनातील पारदर्शकता आणि कायद्याचे राज्य मजबूत करण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.
ही भेट केवळ औपचारिक न राहता, राष्ट्रहित, संविधानिक मूल्ये आणि लोकशाहीच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने प्रेरणादायी ठरली. अशा संवादातून प्रशासन व न्यायसंस्था यांच्यातील परस्पर सन्मान आणि सहकार्य अधिक दृढ होत असल्याचे चित्र दिसून आले.