Home Breaking News नागपूरमध्ये मतदानाचा उत्साह शिगेला – भाजप कार्यकर्त्यांच्या भेटीतून नागरिकांचा आत्मविश्वास अधिक दृढ

नागपूरमध्ये मतदानाचा उत्साह शिगेला – भाजप कार्यकर्त्यांच्या भेटीतून नागरिकांचा आत्मविश्वास अधिक दृढ

नागपूर शहरातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेचा आढावा घेत आज भाजप कार्यकर्त्यांची भेट घेण्यात आली. प्रत्येक बूथवर जाऊन तेथील कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले गेले तसेच नागरिकांना योग्य व अचूक माहिती देण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे मनापासून कौतुक करण्यात आले.
लोकशाहीच्या या महापर्वात मतदार मोठ्या संख्येने घराबाहेर पडताना दिसत असून, प्रत्येक बूथवर उत्साहाचे वातावरण आहे. भाजप कार्यकर्ते नागरिकांना मतदानाचे महत्त्व समजावून सांगत शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने मतदान पार पडावे यासाठी परिश्रम घेत आहेत. त्यांच्या या सेवाभावी भूमिकेमुळे अनेक नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यास मदत होत आहे.
खालील बूथला भेट देऊन कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यात आले –
📍 बजाज नगर
📍 अभ्यंकर नगर
📍 कामगार नगर
📍 आयटी पार्क
📍 त्रिमूर्ती नगर
📍 जयताळा
📍 रमाबाई आंबेडकर नगर
📍 दीन दयाळ नगर
📍 सोनेगाव तलाव, खामला
📍 जयप्रकाश नगर
📍 सीता नगर, सोमळवाडा
📍 पावन भूमी, सोमळवाडा
📍 नरेंद्र नगर, बोरकुटे
📍 रामेश्वरी, धाडीवाल
📍 गणेश पेठ, कॉटन मार्केट
प्रत्येक ठिकाणी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. “लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे,” हा संदेश बूथ-बूथवर पोहोचवण्यात आला. शांततापूर्ण, पारदर्शक आणि लोकशाही मूल्यांना साजेशा पद्धतीने मतदान पार पडावे, यासाठी भाजप कार्यकर्ते अहोरात्र झटत आहेत.