कल्याण–डोंबिवली : कल्याण–डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत भाजपा–महायुतीने विजयाचा डंका वाजवत आपली संघटनात्मक ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. कोपरगाव प्रभाग क्रमांक २४-ब मधून भाजपा–महायुतीच्या अधिकृत उमेदवार ज्योतीताई पाटील यांचा बिनविरोध विजय झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
या बिनविरोध विजयामुळे प्रभागातील नागरिकांचा भाजपा–महायुतीवर असलेला विश्वास अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. विकासकामांची सातत्यपूर्ण वाटचाल, जनतेशी थेट संवाद आणि स्थानिक प्रश्नांवर प्रभावी भूमिका यामुळेच हा विजय मिळाल्याचे मानले जात आहे.
विजयानंतर ज्योतीताई पाटील यांनी सदिच्छा भेटी घेतल्या. यावेळी त्यांचे सहर्ष अभिनंदन करण्यात आले तसेच नगरसेविका पदाच्या आगामी कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. नागरिकांच्या अपेक्षांवर खरे उतरून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या प्रसंगी भाजपा जुनी डोंबिवली मंडल अध्यक्ष पवन पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी या विजयाला महायुतीच्या संघटनात्मक यशाची पावती असल्याचे मत व्यक्त केले.
हा विजय आगामी महानगरपालिका राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात असून, कल्याण–डोंबिवलीत भाजपा–महायुतीची पकड अधिक मजबूत होत असल्याचे संकेत मिळत आहेत.