पुणे : केएडब्ल्यू व्हेलोस मोटर्स प्रा. लि. (KVMPL) अंतर्गत कार्यरत असलेल्या मोटोहाऊसने क्रिशा मोटो यांच्या सहकार्याने पुण्यात जागतिक दर्जाच्या ब्रिक्स्टन मोटरसायकल्स आणि VLF स्कूटर्सची भव्य श्रेणी अधिकृतपणे उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातून पुणेकरांना आता प्रीमियम, आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आणि स्टायलिश टू-व्हीलर्सचा अनुभव घेता येणार आहे.
मोटोहाऊसमार्फत पुण्यात ब्रिक्स्टन क्रॉसफायर 500एक्स, क्रॉसफायर 500एक्ससी, क्रॉमवेल 1200, क्रॉमवेल 1200एक्स (लिमिटेड एडिशन) आणि स्टॉर 500 या दमदार मोटरसायकल्स सादर करण्यात आल्या आहेत. यासोबतच VLF मॉबस्टर 135 पेट्रोल स्कूटर आणि VLF टेनिस इलेक्ट्रिक स्कूटर शहरी प्रवासासाठी उपयुक्त, सोयीस्कर आणि पर्यावरणपूरक पर्याय म्हणून उपलब्ध आहेत.
या प्रसंगी KVMPL – मोटोहाऊसचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. तुषार शेळके म्हणाले, “मोटोहाऊससाठी हा केवळ व्यवसायिक विस्तार नाही, तर जागतिक दर्जाची टू-व्हीलर्स वाहने भारतीय ग्राहकांपर्यंत पोहोचवणे आणि परंपरा व आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख मेळ घालणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. पुण्यात सुरू झालेल्या या नव्या डीलरशिपमुळे ग्राहकांना प्रीमियम ब्रँडचा सखोल अनुभव मिळेल.”
पुण्यातील या नवीन डीलरशिपमध्ये 2,000 चौ. फूटांचे प्रशस्त शोरूम आणि 1,000 चौ. फूटांचे अत्याधुनिक वर्कशॉप उपलब्ध असून, येथे ग्राहकांना उत्कृष्ट आफ्टर-सेल्स सर्व्हिस आणि विश्वासार्ह देखभाल सुविधा मिळणार आहेत.
ग्राहकांच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे वॉरंटी सुविधा. 🔹 ब्रिक्स्टन मोटरसायकल्ससाठी 2 वर्षांची स्टँडर्ड वॉरंटी + 2 वर्षांची एक्स्टेन्डेड वॉरंटी 🔹 VLF टेनिस इलेक्ट्रिक स्कूटरसाठी 3 वर्षांची वाहन वॉरंटी + 3 वर्षांची बॅटरी वॉरंटी देण्यात येत आहे.
प्रीमियम डिझाइन, दमदार इंजिन, सुरक्षितता आणि पर्यावरणपूरक पर्याय यांचा संगम असलेली ही रेंज पुण्यातील टू-व्हीलर बाजारात नवा मानदंड प्रस्थापित करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.