भारत सरकारने 30 नोव्हेंबर 2025 रोजी जारी केलेल्या नवीन निर्देशांनुसार, आता व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, Signal, Snapchat, ShareChat, JioChat आणि इतर मेसेजिंग अॅप्ससाठी “SIM-बाइंडिंग” अनिवार्य करण्यात आले आहे. या नियमानुसार, आता एखाद्या मोबाइलवर ते अॅप्स चालवण्यासाठी त्या फोनमध्ये कार्यशील आणि नोंदणीकृत सिम कार्ड असणे आवश्यक आहे. जर सिम नसेल, बदलले असेल किंवा काढले गेले असेल, तर अँप आपोआप बंद होईल.
नवीन कायदे — काय बदलणार आहे?
-
सतत सिम लिंक आवश्यक: जेव्हा नोंदणी केली होती त्या सिम कार्डचा मोबाईलमध्ये असणे गरजेचे. अन्यथा, अॅप काम करणार नाही.
-
वेब/डेस्कटॉप वापरकर्त्यांसाठी बदल: WhatsApp Web, Telegram Web सारख्या सेवांमध्ये आता प्रत्येक ६ तासांनी आपोआप लॉगआउट होईल; पुनः लॉगइनसाठी QR-कोड स्कॅन करावा लागेल.
-
हे नियम लागू करण्यासाठी मेसेजिंग प्लॅटफॉर्म्सना 90 दिवसांचे वेळेचं निश्चिती देण्यात आली आहे. त्या आत बदल करणे अनिवार्य आहे.
उद्देश काय आहे? — सायबर फसवणुकीवर अंकुश
केंद्र सरकारने सांगितलं आहे की, सध्याच्या पद्धतीत, एकदा नंबर पडताळणी झाल्यावर सिम बदल किंवा काढल्यानंतरही व्यक्ती अॅप्सवर काम करत रहु शकते — अशा धोरणाचा गैरवापर, फेक खाते, आयडेंटिटी फसवणूक, स्पॅम आणि फोन-आधारित धोके होण्याची शक्यता वाढते. हे धोके विशेषतः आंतरराष्ट्रीय स्तरावर असल्याचा अनुभव असल्यामुळे आता हा नियम लागू करण्यात आला आहे.
सरकारने या सुधारणांमुळे सुरक्षा, ट्रेसबिलिटी आणि डिजिटल ट्रस्ट वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.
युजर्ससाठी काय बदलतं?
-
जर तुमच्याकडे वर्किंग सिम नसेल, म्हणजे जुना किंवा न वापरला जाणारा फोन असेल — WhatsApp/Telegram काम करणार नाही.
-
वायफाय-फक्त टॅबलेट किंवा दुसऱ्या डिव्हाइसवर अॅप चालवत असाल, तर आता काम बंद होईल.
-
WhatsApp Web किंवा Telegram Web वर सतत लॉगिन ठेवणे अशक्य होईल — ६ तासांनी नवे लॉगिन करावा लागेल.
-
प्रवास करणारे, अनेक डिव्हाइस वापरणारे लोक, किंवा बुकेट-सिम वापरणारे युजर्स यांना हे बदल त्रासदायक वाटू शकतात.





