Home Breaking News महाराष्ट्रात रॅपिडो-उबरवर एफआयआर! अवैध बाईक टॅक्सीविरोधात राज्य सरकारची मोठी मोहिम सुरू

महाराष्ट्रात रॅपिडो-उबरवर एफआयआर! अवैध बाईक टॅक्सीविरोधात राज्य सरकारची मोठी मोहिम सुरू

79
0
महाराष्ट्र : राज्यात अवैधरीत्या धावणाऱ्या बाईक टॅक्सी सेवांविरोधात अखेर मोठी कारवाई सुरू झाली आहे. रॅपिडो, उबर व इतर अॅप-आधारित बाईक टॅक्सी प्लॅटफॉर्मवर महाराष्ट्र पोलिसांनी एफआयआर दाखल करून कठोर पावले उचलली आहेत. परवानाधारक न घेता प्रवासी वाहतूक, सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि मोटार वाहन अधिनियमाचे सर्रास उल्लंघन या कारणांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये, विशेषतः मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे इत्यादी ठिकाणी बाईक टॅक्सी सेवा मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. प्रवाशांना स्वस्त पर्याय मिळत असल्याने या सेवांची मागणी वाढत होती. मात्र, वाहतूक विभागाकडे योग्य परवाने, विमा आणि सुरक्षा निकष पूर्ण न करता ही वाहतूक सुरू असल्याचे आढळल्यानंतर सरकारने कठोर भूमिकेत पावले उचलली.
एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अवैधरीत्या चालणाऱ्या दोन लाखांहून अधिक बाईक टॅक्सींची चौकशी करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर जप्तीची मोहिम राबवली जात असून, चालकांवरही कारवाई केली जाणार आहे. काही चालकांनी परवानाधारक टॅक्सी ड्रायव्हर्सची मक्तेदारी मोडली असल्याच्या तक्रारीही गेल्या काही काळात नोंदवण्यात आल्या होत्या.
सरकारने स्पष्ट केले आहे की, ज्या कंपन्या प्रवासी वाहतूक करू इच्छितात त्यांनी स्टेट ट्रान्सपोर्ट अथवा मोटार वाहन विभागाकडून आवश्यक परवाने घेणे अनिवार्य आहे. त्याशिवाय अॅपद्वारे राईड बुकिंग करणे बेकायदेशीर ठरेल.
या कारवाईने प्रवासी, चालक व टॅक्सी उद्योगात मोठी खळबळ उडाली आहे. काही जण या मोहिमेचे स्वागत करत असताना, काही प्रवासी यामुळे स्वस्त प्रवासाचे पर्याय कमी झाल्याने नाराजी व्यक्त करत आहेत. पुढील काही दिवसांत ही कारवाई आणखी व्यापक होण्याची शक्यता आहे.
राज्यात ट्रान्सपोर्ट विभागाने जनजागृती मोहीमही सुरू केली असून, सुरक्षित प्रवासासाठी केवळ परवानाधारक वाहनांचा वापर करा, असे आवाहन करण्यात येत आहे.