पिंपरी चिंचवड जिल्हा निवडणूक संचालन समितीच्या संयोजक पदी आमदार अमित गोरखे तर सहसंयोजक म्हणून मोरेश्वर शेडगे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्शभूमीवर निवडणूक कालखंडात संपूर्ण निवडणूक प्रक्रिया राबविणे तसेच उमेदवारांच्या मुलाखती त्यासाठी उमेदवार चयन करणे व निवडणूक प्रचार यंत्रणा कार्यान्वित करणे यासाठी जिल्हा निवडणूक संचालन समितीची भूमिका अत्यंत महत्वाची असते.





