पुणे: पुणे शहरातील खंडणी विरोधी पथक – २, गुन्हे शाखा ने एका महत्वाच्या कारवाईत निलेश घायवळ टोळीचा पाहिजे आरोपी मुसाब इलाही शेख (वय ३५, रा. संत ज्ञानेश्वर कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरुड) गांजासह जेरबंद केला आहे. ही कारवाई दि.१५/१०/२०२५ रोजी शहरातील सार्वजनिक रोडवर रात्र्रीत पोलीस पेट्रोलिंग दरम्यान करण्यात आली.
पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, पोलीस उप-निरीक्षक गौरव देव आणि पोलीस अंमलदार अमोल घावटे यांनी संशयित हालचालींवर लक्ष ठेवत असताना, राधीका मसाला शॉप समोर मुसाब इलाही शेख उभा असल्याचे पाहिले. पोलीसांनी त्याला नोंद घेण्याचा प्रयत्न केला असता, आरोपी ताबडतोब पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र पोलीस कर्मचाऱ्यांच्या वेगवान कारवाईत त्याला रात्री ०३:१० वा. ताब्यात घेतले.
अधिक चौकशीत मुसाब इलाही शेख हा निलेश घायवळ टोळीशी संबंधित असल्याचे समोर आले. त्याच्यावर कोथरुड पोलीस स्टेशन गुन्हे नोंद क्र. २५०/२०२५ अंतर्गत भा.न्या.सं.क. १०९, ३५१, ३५२, १८९, १९०, १९१, १११, ६१, ४९, तसेच आर्म अॅक्ट व महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ अंतर्गत पाहिजे आरोपी म्हणून कारवाई करण्यासाठी नोंद आहे.
तपासात मुसाब इलाही शेखकडून ८७८ ग्रॅम गांजा (किंमत रु. १८,२६०/-) जप्त करण्यात आला. त्याने ही गांजा आपला मित्र तेजस पुनमचंद डांगीरा कडून विक्रीसाठी आणली असल्याचे सांगितले. यानंतर पोलीसांनी तेजस पुनमचंद डांगीरा (वय ३३, रा. रमाना सृष्टी फ्लॅट, मानाजीनगर, पुणे) यालाही ताब्यात घेतले.
ही कारवाई पुणे पोलीस आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, पोलीस उप-निरीक्षक गौरव देव, तसेच अंमलदार अमोल घावटे यांनी यशस्वीरित्या केली. पुणे शहरातील नागरिकांसाठी ही कारवाई सुरक्षा व गुन्हे प्रतिबंधक धोरणांतील मोठा यश ठरली आहे.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही संशयास्पद व्यक्ती किंवा अंमली पदार्थाच्या व्यापाराबाबत तात्काळ पोलीसांशी संपर्क साधावा. ही कारवाई शहरात अंमली पदार्थांच्या गैरव्यवहारावर मोठा प्रहार ठरली आहे.