पुणे – सहकारनगर पोलिस ठाण्याच्या पथकाने केलेल्या मोठ्या कारवाईत गंभीर गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, पोलिसांच्या या सतर्कतेचे कौतुक केले जात आहे.
घटनेचा तपशील असा की, 2 जुलै 2025 रोजी एका नागरिकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. आरोपींनी धारदार शस्त्र वापरून जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी काही दिवसांपासून फरार होते.
सहकारनगर पोलिसांनी कसून तपास सुरू ठेवत संशयितांचा शोध घेतला. अखेर गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींना पकडले. या प्रकरणी IPC कलम 118(1), 115(2), 352 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या कारवाईत पोलिसांनी केवळ आरोपींना अटकच केली नाही तर त्यांच्याकडून वापरलेली शस्त्रे आणि इतर साहित्य देखील जप्त केले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाईमुळे नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे.
पोलिसांनी यावेळी स्पष्ट संदेश दिला की, पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्था बिघडविणाऱ्या कोणालाही पोलिसांकडून दया दाखवली जाणार नाही. अशा कठोर कारवायांमुळे गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण झाली असून, नागरिकांच्या सुरक्षेला अधिक बळकटी मिळाली आहे. सहकारनगर पोलिसांची मोठी कामगिरी – प्राणघातक हल्ल्यातील आरोपी अटकेत, परिसरात दिलासा