Home Breaking News सहकारनगर पोलिसांची मोठी धडक कारवाई : १० किलोहून अधिक गांजा जप्त, सराईत...

सहकारनगर पोलिसांची मोठी धडक कारवाई : १० किलोहून अधिक गांजा जप्त, सराईत आरोपी अटकेत

२९ ऑगस्ट २०२५ रोजी सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या एका सराईत आरोपीस पोलिसांनी शिताफीने पकडले. या कारवाईत तब्बल १० किलो १३८ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत ₹३ लाख इतकी आहे. आरोपीला ताब्यात घेत पोलिसांनी एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

संशयास्पद हालचालींवर पोलिसांचा धडाका
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक सातारा रोडवरील मोरे वस्ती परिसरात अवैध धंद्यांविरोधात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलिस अंमलदार अमोल पवार व अभिजीत वालगुडे यांना एन.डी.पी.एस. अभिलेखावरील सराईत आरोपी प्रसाद गणेश हारगुळे हा एका खोलीतून संशयास्पदरीत्या बाहेर येताना दिसला. पोलिसांना पाहताच तो पळ काढू लागल्याने पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.
 आरोपीची चौकशी आणि धक्कादायक उघडकी
सुरुवातीला आरोपी उडवाउडवीची उत्तरे देत होता. मात्र त्याचा वावर संशयास्पद वाटल्याने त्याला त्याच खोलीत घेऊन तपासणी करण्यात आली. खोलीतून येणारा तीव्र वास लक्षात घेऊन पंचासमक्ष शोध घेतला असता, खोलीच्या मध्यभागी ठेवलेल्या एका मोठ्या कापडी पिशवीत सहा प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरलेला गांजा आढळून आला. सदर पदार्थाचे वजन १० किलो १३८ ग्रॅम निघाले, ज्याची बाजारभाव किंमत ₹३ लाख इतकी आहे.
चौकशीअंती आरोपीने कबुली दिली की हा गांजा त्याच्या साथीदाराचा असून तो स्वतः त्या मालाचे पॅकिंग करून चोरीछुप्या पद्धतीने विक्रीसाठी आणखी वितरण करणार होता.
 पोलिसांची शिताफी व धडाकेबाज कारवाई
या प्रकरणी सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. ३६१/२०२५, एन.डी.पी.एस. कायद्याच्या कलम ८(क), २०(ब)(II)(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उपायुक्त, परिमंडळ २ श्री. मिलींद मोहीते, मा. सहायक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग श्री. राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरेखा चव्हाण, सहा. पोलीस निरीक्षक सागर पाटील, पोउपनिरीक्षक सद्दाम हुसेन फकीर यांच्यासह पोलीस अंमलदार बापु खुटवड, अमोल पवार, अभिजीत वालगुडे, बजरंग पवार, सागर सुतकर, निखील राजीवडे, किरण कांबळे, संजय म्हस्के, अशोक ढावरे, अमित पदमाळे, महेश भगत, सत्यवान बाठे व रवी कदम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. गांजा विक्रीसाठी साठवणाऱ्या सराईताला पोलिसांचा शिताफीने पाडाव; ₹३ लाखांचा मुद्देमाल जप्त