Home Breaking News पुणे शहरात मोठी धडक कारवाई : परिमंडळ ४ पोलिसांकडून अंमली पदार्थ विक्रेत्यांवर...

पुणे शहरात मोठी धडक कारवाई : परिमंडळ ४ पोलिसांकडून अंमली पदार्थ विक्रेत्यांवर गजाआड, ४ किलो ६६४ ग्रॅम गांजा जप्त

51
0
पुणे : शहरातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी आणखी एक धडाकेबाज कारवाई केली आहे. परिमंडळ ४ गुन्हे शाखेच्या विशेष मोहिमेत अंमली पदार्थ विक्री व सेवन करणाऱ्या आरोपींवर पोलिसांनी कडक कारवाई करत ४ किलो ६६४ ग्रॅम गांजा जप्त केला असून त्याची बाजारभाव किंमत तब्बल ₹८८,६६० इतकी आहे.
कशी झाली कारवाई?
२१ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ९ वाजल्यापासून पोलिसांनी विशेष पथक तयार करून कारवाई हाती घेतली. परिमंडळ ४ च्या हद्दीत गुप्तपणे अंमली पदार्थ विकणाऱ्या आणि सेवन करणाऱ्यांवर छापा टाकण्यात आला. या मोहिमेदरम्यान ५३ संशयितांची अंगझडती, घरझडती व वाहनझडती घेण्यात आली. त्यापैकी ६ आरोपींविरुद्ध ४ गुन्हे दाखल करण्यात आले.
कारवाईत सहभागी बल
या कारवाईसाठी ३६ पोलीस अधिकारी व १३३ पोलीस कर्मचारी अशा मोठ्या पथकाची मदत घेण्यात आली. पोलिसांच्या या संयुक्त कारवाईमुळे शहरात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग श्री. मनोज पाटील, परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त श्री. सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त (येरवडा) सौ. प्रांजली सोनवणे व सहायक पोलीस आयुक्त (खडकी) श्री. विठ्ठल दबडे यांच्या सूचनांनुसार पार पडली.
पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांचे प्रतिपादन
“पुणे शहरात कुठल्याही प्रकारचा अवैध धंदा सहन केला जाणार नाही. अंमली पदार्थ विक्रेत्यांवर कठोर कारवाई करत त्यांचे संपूर्ण उच्चाटन करणे हे आमचे ध्येय आहे. नागरिकांनीदेखील अशा बेकायदेशीर कृत्यांची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे.”
परिसरातील नागरिकांचा दिलासा
या कारवाईनंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांचे मनःपूर्वक कौतुक केले आहे. “पोलिसांच्या धाडसी कारवाईमुळे तरुण पिढी अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकण्यापासून वाचेल,” असे नागरिकांचे म्हणणे आहे.
🔹 पुण्यात पोलिसांचा मोठा सडा – ८८ हजारांचा गांजा जप्त
🔹 ६ आरोपींवर गुन्हे दाखल, ५३ जणांची अंगझडती व चौकशी
🔹 पोलिसांची प्रभावी मोहीम : अंमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण