
वाहतूक कोंडी, पाणी साचणे आणि खड्ड्यांमुळे आधीच पुणेकर त्रस्त आहेत. अशा वेळी पावसातच डांबर टाकणे हे प्रशासनाचे गैरजबाबदार पाऊल असल्याचे सांगत सोशल मीडियावरही संताप व्यक्त होत आहे. महापालिकेकडून दर्जेदार रस्ते द्यावेत आणि नियोजनबद्ध काम व्हावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.