Home Breaking News ज्ञानोबा-तुकाराम जयघोषात दुमदुमला टाळगाव-चिखली परिसर महापालिकेच्या शाळेत रंगला भक्ती, एकात्मता आणि...


शाळेतील विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषेत सहभाग घेतला होता. महिला बचत गटांच्या सदस्यांनी, स्थानिक समाजसेवकांनी, वारकरी बांधवांनी तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पालखी सोहळ्याची शोभा वाढवली. वारकरी परंपरेतील पालखी सोहळा जसा श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक आहे, तसाच तो एकात्मता आणि सामाजिक बंध दृढ करणारा सोहळा ठरला.
पालखी सोहळ्याचे आयोजन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, समाज विकास विभाग उपायुक्त ममता शिंदे, शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण कुमार मोरे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपिठाचे संचालक ह. भ. प. राजू महाराज ढोरे ,डॉ. स्वाती मुळे आणि शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. त्यांच्या नियोजनामुळे आणि समन्वयामुळे संपूर्ण मिरवणूक सोहळा शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडला.