Home Breaking News “कबुतरखाना निमित्तमात्र… मूळ उद्देश समाजाची ताकद दाखवण्याचा! – मुंबईत मराठी अस्मितेवर घाला?”

“कबुतरखाना निमित्तमात्र… मूळ उद्देश समाजाची ताकद दाखवण्याचा! – मुंबईत मराठी अस्मितेवर घाला?”

149
0
मुंबईतील ऐतिहासिक कबुतरखाना परिसर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सध्या घडत असलेल्या घटनांवर नजर टाकल्यास स्पष्ट होते की, कबुतरखाना हा फक्त निमित्त आहे. यामागील मूळ उद्देश काही विशिष्ट समाजांनी आपली संख्या, संघटना आणि ताकद दाखवण्याचा प्रयत्न करणे आहे.
ही केवळ धार्मिक वा सांस्कृतिक घडामोड नसून, ही एक ठरवून आखलेली रणनीती आहे – जिच्या माध्यमातून मुंबईसारख्या महानगरावर आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे सगळं होत असताना, मूळ मुंबईकर मराठी माणूस मात्र बाजूला ढकलला जातोय.
आज एक समाज ताकद दाखवतोय, उद्या दुसरा. ही एक श्रृंखला बनू लागली आहे, आणि या प्रवाहात आपली ओळख, आपले अस्तित्व हरवत चालले आहे. मुंबई जी कधी काळी ‘मराठी माणसाची शान’ म्हणून ओळखली जायची, ती आता परकी लोकांच्या दडपणात गिळली जात आहे.
जर वेळेत भान आलं नाही, आणि जागृती झाली नाही, तर “मराठी” ही संज्ञा ऐकायलाही मिळणार नाही, अशी भीती निर्माण झाली आहे. म्हणूनच, हे फक्त कबुतरखान्यापुरते मर्यादित नसून, ही संपूर्ण मुंबईवर मराठी अस्मिता संपवण्याची रणनीती आहे.
ही वेळ आहे एकजुट होण्याची… आपली संस्कृती, आपली भाषा, आपली ओळख जपण्याची. अन्यथा उद्याचा इतिहास वेगळा लिहिला जाईल – ज्यात “मराठी” हा शब्द फक्त संग्रहालयात पाहायला मिळेल!