चिखली, पुणे | प्रतिनिधी
चिखली परिसरातील स्पाईन रोड वर दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अनधिकृत पार्किंगमुळे अपघातांची मालिका सुरु झाली आहे. विशेषतः अटल बिहारी वाजपेयी गार्डन परिसरात शनिवार आणि रविवारी संध्याकाळच्या सुमारास टेम्पो, ट्रक आणि बस यांची रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येते. परिणामी, वाहतूक कोंडी, पादचाऱ्यांना होणारा त्रास आणि लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सामाजिक कार्यकर्ते अरुण पाडुळे यांची ठाम भूमिका
या समस्येकडे लक्ष वेधून सामाजिक कार्यकर्ते अरुण पाडुळे यांनी स्पाईन रोडवरील अनधिकृत पार्किंग हटवण्याची मागणी केली असून, संबंधित वाहनांवर त्वरित दंडात्मक कारवाई करावी, असे ठणकावून सांगितले आहे. यासाठी त्यांनी आज चिखली पोलीस ठाणे गाठून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांच्याशी विशेष बैठक घेतली.
पोलीस प्रशासनाची तत्काळ दखल
साळुंखे साहेबांनी तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले असून, वाहतुकीच्या सुरळीत व्यवस्थेसाठी वाहनांवर दंडात्मक कारवाई व हटविण्याचे आदेश दिले आहेत.
स्थानिक नागरिक व परिसरातील रहिवासी या निर्णयाचे स्वागत करत असून, लवकरच अडथळ्यांपासून मुक्तता मिळेल, अशी आशा व्यक्त केली आहे.
नागरिकांची व्यथा
“रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी उभ्या असलेल्या वाहनांमुळे ज्येष्ठ नागरिक व महिलांना चालणेही अशक्य झाले आहे.”
“लहान मुले आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी हा रस्ता असुरक्षित बनला आहे.”
“वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका अडकल्याचे प्रसंग वारंवार घडले आहेत.”
कारवाईचे अपेक्षित परिणाम
स्पाईन रोडवरून जाणाऱ्या नागरिकांना सुरक्षित व अडथळारहित वाहतूक
अपघातांची शक्यता कमी






