Home Breaking News शस्त्रसाठा प्रकरणात नवा ट्विस्ट! पोलिसांवरच दिशाभूल केल्याचा आरोप; न्यायालयाकडून नोटीस

शस्त्रसाठा प्रकरणात नवा ट्विस्ट! पोलिसांवरच दिशाभूल केल्याचा आरोप; न्यायालयाकडून नोटीस

135
0
मुळशी (पुणे) – मुळशीच्या जंगलात झालेल्या कथित शस्त्र सराव प्रकरणात अटक झालेल्या गणेश मोहिते याने आता थेट पोलिसांवरच गंभीर आरोप करत, संपूर्ण कारवाई ही न्यायालयाची दिशाभूल करण्यासाठीच रचल्याचा दावा केला आहे. या दाव्याची दखल घेत न्यायालयाने आता पौड पोलिस प्रशासनाला नोटीस बजावली असून, खऱ्या घटनेचा तपशील पुढे येण्याची अपेक्षा आहे.
या प्रकरणात अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, एका घटनेवर एकाचवेळी दोन पोलिस ठाण्यांत स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. सासवड पोलिस ठाण्यात जमीन व्यवहाराशी संबंधित गुन्हा आधीच दाखल असून, त्याच घटनेचा संदर्भ वापरून पौड पोलिसांनी नवीन शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
घटनेचे तपशील असे –
▪️ मुळशीतील जंगलात ७ ते ८ पिस्तुलांचा वापर करून गोळीबार सराव केल्याचा आरोप
▪️ ८ जुलै रोजी गणेश मोहिते याला येरवडा कारागृहातून अटक
▪️ कारवाईसाठी व्हॉट्सअ‍ॅप कॉल रेकॉर्डिंगचा आधार
▪️ संशयित आरोपीवर आधीच सासवड पोलिस ठाण्यात जमीन प्रकरणात गुन्हा दाखल
▪️ त्या गुन्ह्याचा संदर्भ घेऊनच पौड पोलिसांनी स्वतंत्र शस्त्र गुन्हा नोंदवला
▪️ एका घटनेवर दोन ठिकाणी गुन्हा – वकिलांचा आक्षेप
वकील प्रसन्नकुमार जोशी यांनी न्यायालयात सविस्तर युक्तिवाद करताना सांगितले की, ही संपूर्ण प्रक्रिया न्यायालयाची दिशाभूल करण्यासाठी वापरली गेली आहे. त्यांनी यासाठी संबंधित पोलिसांवर कारवाईची मागणी केली असून, याबाबत सत्यतपासणी होणे अत्यावश्यक आहे.