Home Breaking News मुंबई पावसाचा कहर! रेड अलर्ट जारी, पाणी तुंबल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा; ठाणे-रायगड रेड,...

मुंबई पावसाचा कहर! रेड अलर्ट जारी, पाणी तुंबल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा; ठाणे-रायगड रेड, पुणे-कोल्हापूर ऑरेंज अलर्टवर

दिनांक: १५ जुलै २०२५ |  मुंबई :- मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा बसत आहे. सततच्या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले असून, भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट, तर ठाणे, रायगड, मुंबई उपनगरासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे.
पुणे, सातारा, अहमदनगर ऑरेंज अलर्टवर, तर कोल्हापूर, गडचिरोली, पालघर, सांगली आणि गोंदिया यलो अलर्टवर आहेत.

वाहतूक व्यवस्थेवर गंभीर परिणाम
अंधेरी पश्चिमेतील अंधेरी सबवे मध्ये सुमारे २ फूट पाणी साचल्यामुळे सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आली असून, वाहतूक गोखले ब्रिजमार्गे वळवण्यात आली आहे.
जोगेश्वरी (Hub Mall WEH South Bound) येथे पाण्यामुळे वाहतूक अत्यंत संथ.
साकीनाका (चांदिवली रोड जंक्शन) परिसरात पाणी साचल्याने अडथळा.
घाटकोपर, कुर्ला, गांधीनगर, एसआरपीएफ गेटसमोरील सेवा रस्त्यावर १ फूट पाण्यामुळे वाहनांची संथगती.
कुर्ला डेपो आणि सर्वे जंक्शनवरही अशीच स्थिती आहे.
विमानसेवांवर परिणाम
इंडिगो, स्पाईसजेट, अकासा एअर यांनी पावसामुळे विमान विलंबाची शक्यता वर्तवून प्रवाशांना सतर्कतेचं आवाहन केलं आहे.
मुंबई विमानतळावर काही उड्डाणे विलंबाने सुरू झाल्याचेही समजते.
 हवामान खात्याचा इशारा
भारतीय हवामान विभागानुसार, पुढील ३-४ तासात मुंबई व ठाणे परिसरात विजांसह वादळी वाऱ्यांसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
IMD ने नागरिकांना नदीकाठ, सखल भाग आणि समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.
 प्रशासनाचे आवाहन
मुंबई महानगरपालिका आणि वाहतूक पोलिसांकडून नागरिकांना आवश्यक नसल्यास घराबाहेर न पडण्याचं आवाहन.
महावितरण, पालिका यंत्रणा आणि आपत्कालीन यंत्रणा सतर्क.
शाळा-कॉलेज बंद ठेवण्याचा विचार काही भागात सुरु.
 नागरिकांमध्ये संताप
सततच्या पावसामुळे साचलेले पाणी, अपुरी ड्रेनेज यंत्रणा, रस्त्यांवरील खड्डे आणि वाहतुकीतील अडथळ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सोशल मीडियावर #MumbaiRains आणि #Waterlogging ट्रेंड करत आहेत.