Home Breaking News पुण्यात वाहनचोरी प्रकरणात मोठा खुलासा! गुन्हे शाखेच्या पथकाची धडक कारवाई, आरोपी जेरबंद,...

पुण्यात वाहनचोरी प्रकरणात मोठा खुलासा! गुन्हे शाखेच्या पथकाची धडक कारवाई, आरोपी जेरबंद, ₹४०,००० किंमतीची रिक्षा जप्त

पुणे | पुणे शहराच्या गुन्हे शाखेतील दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक – १ ने एक महत्त्वाची कारवाई करत चोरीस गेलेली तीन चाकी ऑटो रिक्षा जप्त करत एक सराईत आरोपी जेरबंद केला आहे.
ही कारवाई दिनांक ११ जुलै २०२५ रोजी करण्यात आली असून, फरासखाना पोलीस स्टेशनमधील गुन्हा उघडकीस आणण्यात पोलीस दलाला यश आले आहे.
 कारवाईचा तपशील:
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकातील पोलीस अंमलदार प्रदीप राठोड व शिवाजी सातपुते यांनी CCTV फुटेजच्या आधारे तपास करताना आरोपीविषयी माहिती मिळवली.
विशेष बातमीदाऱ्यांद्वारे समजले की, संगमवाडी स्मशानभूमीजवळ चोरीस गेलेली रिक्षा उभी आहे आणि त्या ठिकाणी संशयित व्यक्ती आढळली.
त्यानंतर सापळा रचून पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले. त्याची नाव- सुरज बाबुराम पांडे (वय ३५), मूळ गाव – प्रयागराज, उत्तरप्रदेश, सध्या पुण्यात वास्तव्यास होता. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून ₹४०,००० किंमतीची एक तीन चाकी रिक्षा जप्त करण्यात आली आहे.
मार्गदर्शन व सहकार्य:
या कारवाईसाठी पोलीस अधिकारी व अंमलदारांनी परिश्रम घेतले असून, ही कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. विवेक मासाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) श्री. गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी:

🔹 वरिष्ठ पोलीस निरीक्षक: संदीप भोसले
🔹 सहाय्यक पोलीस निरीक्षक: प्रविण काळुखे, वर्षा कावडे
🔹 पोलीस अंमलदार: प्रदीप राठोड, गणेश ढगे, शिवाजी सातपुते, अजित शिंदे, धनंजय ताजणे, बाळू गायकवाड, निनाद माने, दत्तात्रय पवार, महेश पाटील, साईकुमार कारके, अमित गद्रे, नारायण बनकर
 पोलिसांचे आवाहन:
पुणे पोलिसांकडून नागरिकांना सूचना करण्यात आली आहे की, कुठल्याही वाहनविषयी संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावे.
अशा कारवाईमुळे चोरीचे प्रमाण कमी होणार असून नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाणार आहे.