पुणे | विश्रांतवाडी परिसरात पिस्तुलचा धाक दाखवून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पुणे शहर पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्हेगाराकडून एक विदेशी बनावटीचे पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असून, सुमारे ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
घटनेचा सविस्तर तपशील:
दि. 10 जुलै रोजी विश्रांतवाडी पोलिस स्टेशनचे तपास पथक गस्त घालत असताना पो. अं. संपत भोसले यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली, की रेकॉर्डवरील गुन्हेगार राज ऊर्फ सोन्या रविंद्र भवार (वय २४, रा. भिमनगर, विश्रांतवाडी) हा धानोरी रोडवरील पाण्याच्या खदानीजवळ लोकांना पिस्तुलचा धाक दाखवून धमकावत आहे.
या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने सापळा रचत कार्यवाही केली. पोलीस पाहताच आरोपीने पिस्तुल कमरेला लपवून पळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:
एक विदेशी बनावटीचे पिस्तुल
एक जिवंत काडतूस





