Home Breaking News “मद्यविक्री शुल्कात वाढ, VAT आणि दरवर्षी परवाना नूतनीकरणाच्या निर्णयाविरोधात हॉटेल व्यावसायिकांचा संताप;...

“मद्यविक्री शुल्कात वाढ, VAT आणि दरवर्षी परवाना नूतनीकरणाच्या निर्णयाविरोधात हॉटेल व्यावसायिकांचा संताप; परवाने परत करण्याचा इशारा!”

27
0
नवी मुंबई हॉटेल मालक संघटना (NMHOA) यांनी राज्य सरकारच्या मद्यविक्री शुल्क वाढ, मूल्यवर्धित कर (VAT) आणि दरवर्षी वाढणाऱ्या परवाना नूतनीकरण शुल्काविरोधात तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. संघटनेने एका जाहीर प्रसिद्धीपत्रकाद्वारे सरकारच्या या निर्णयांना अन्यायकारक, एकतर्फी आणि मद्यउद्योगासाठी घातक ठरवले आहे.
 १) मद्यविक्री शुल्क वाढ – भार वाढतच आहे!
राज्य पातळीवरील विविध प्रकल्पांसाठी निधी उभारण्यासाठी आणि निवडणुकीपूर्वीच्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी सरकारने मद्यविक्री शुल्कात वाढ केली आहे. परंतु हॉटेल व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार, फक्त मद्यउद्योगालाच टार्गेट करणे हे अन्यायकारक आहे.
“आम्हाला उद्योगाचा दर्जा दिला गेला खरा, पण कोणतीही सवलत, सॉफ्ट लोन किंवा मदत न मिळाल्यामुळे आम्ही पूर्णपणे स्वतःच्या हिमतीवर उभे राहिलो आहोत,” असे NMHOA च्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
२) व्हॅट (VAT) मध्ये दुप्पट वाढ – ना सल्ला, ना समजून घेण्याची तयारी!
VAT 5% वरून थेट 10% करण्यात आला असून हा निर्णय अर्थसंकट आणि आर्थिक पुनर्बलासाठी घेतल्याचे सांगितले जाते. मात्र, या निर्णयात हॉटेल असोसिएशन्स किंवा मद्य व्यवसायाशी संबंधित घटकांशी कोणतीही चर्चा न करता एकतर्फी निर्णय घेण्यात आला.
“हा निर्णय केवळ हॉटेल व्यवसायालाच नव्हे, तर थेट ग्राहकांनाही आर्थिकदृष्ट्या भार आणणारा आहे,” असे NMHOA ने स्पष्ट केले.
 ३) दरवर्षी वाढणारे परवाना नूतनीकरण शुल्क – नियोजनावर पाणी फेरतंय!
पूर्वी दहा वर्षांतून एकदा जनगणनेनुसार परवाना शुल्कात वाढ केली जात असे, परंतु सध्या दरवर्षी 10% वाढ केली जाते आणि या आर्थिक वर्षात तर थेट 15% वाढ करण्यात आली आहे.
हा निर्णय छोट्या आणि मध्यम व्यावसायिकांवर अन्याय करणारा असल्याचे NMHOA ने सांगितले.
 NMHOA च्या सरकारला सूचना:
A) VAT तात्काळ रद्द करावा
B) परवाना शुल्क वाढ पुन्हा जनगणनेसारख्या आधारावर करावी
C) Excise Duty प्रथम विक्री बिंदूवर लागू करावी – आणि तीही मर्यादित प्रमाणात
D) हॉटेल व्यावसायिकांच्या संघटनांशी सल्लामसलत करून धोरण ठरवावं
E) मद्यसेवा आणि सेवनासाठी स्वतंत्र नियम स्पष्ट करावेत – जुने नियम युगानुरूप सुधारावेत
F) प्रचंड आर्थिक अडचणीमुळे परवाने परत करण्याची वेळ आली आहे; अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल
 इशारा – काय होऊ शकतं?
परवाने परत करण्याची वेळ आल्यास:
राज्याच्या महसुलात मोठी घट
बेकायदेशीर मद्य विक्री वाढ
बनावट दारू, गुन्हेगारीत वाढ
कायदा आणि सुव्यवस्थेवर धोका
“कोरोना महामारीच्या काळातही सरकारकडून मद्य उद्योगाला कोणतीही मदत मिळाली नाही. आजही आम्हाला कोणतेही सहानुभूतीपूर्ण धोरण नाही,” असा थेट आरोप NMHOA ने केला आहे.
 नवी मुंबई हॉटेल मालक संघटना (NMHOA) यांच्या वतीने हा प्रेस नोट प्रसारित करण्यात आला आहे.