दिनांक: ३० जून २०२५ – महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन २०२५ आजपासून मुंबईतील विधान भवनात सुरू झाले असून, या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी सभागृहात ठाम भूमिका घेण्याची तयारी दर्शवली आहे. “कसबा मतदारसंघाच्या जनतेच्या हितासाठी मी पूर्ण ताकदीने आवाज उठवणार आहे,” असे विधान त्यांनी अधिवेशनाच्या प्रारंभी स्पष्ट केले.
आमदार हेमंत रासने यांची भूमिका: “हे अधिवेशन म्हणजे जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्याचे व्यासपीठ आहे. कसब्याच्या नागरिकांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास मी कामातून दाखवणार आहे. पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, सार्वजनिक वाहतूक, शिक्षण व्यवस्था, तसेच वारंवार उद्भवणारे ट्रॅफिक व अतिक्रमणाचे प्रश्न सभागृहात जोरदारपणे मांडणार आहे,” असे रासने यांनी सांगितले.
अधिवेशनात हे मुद्दे घेणार पुढे:
कसबा पेठ क्षेत्रातील सार्वजनिक सुविधांबाबत मागणी
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत कामांच्या प्रगतीचा आढावा
महिला व तरुणांसाठी उपयुक्त योजनांचे पाठबळ
पायाभूत सुविधांसाठी निधीची मागणी
पुणे शहरासाठी स्वतंत्र विकास आराखड्याची गरज
जनतेचा पाठिंबा: कसबा मतदारसंघातील नागरिकांनी सामाजिक माध्यमांवरून आमदार रासने यांच्या भूमिकेचे स्वागत केले असून, “आमच्या प्रश्नांना विधानभवनात आवाज मिळेल,” असा विश्वास व्यक्त केला आहे.
अधिवेशनाचे दृश्य: विधान भवन परिसरात सकाळपासूनच चोख पोलीस बंदोबस्त होता. अधिवेशन सुरू होण्याआधी हेमंत रासने यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि पुढील कामासाठी आशीर्वाद घेतले.