मुंबई: महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीस चालना देण्यासाठी आणि विविध उद्योग क्षेत्रातील गुंतवणूकदारांसोबत थेट संवाद साधण्यासाठी ‘विकसित महाराष्ट्र – महाराष्ट्र उद्योग संवाद’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन २५ जून २०२५ रोजी सकाळी ९ वाजता करण्यात आले. हा कार्यक्रम मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्वेन्शन सेंटर, बीकेसी येथे पार पडला.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण:
प्रमुख चर्चा विषय:
औद्योगिक धोरणांची अंमलबजावणी
राज्यातील विविध क्षेत्रांतील गुंतवणुकीच्या संधी
नव्या औद्योगिक प्रकल्पांमुळे होणारी रोजगारनिर्मिती
प्रादेशिक उद्योगवाढीतील धोरणात्मक योजना
प्रमुख उद्योग क्षेत्रांचा समावेश:
जीवाश्मउर्जा
सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग
वस्त्रोद्योग (Textiles)
सेवा क्षेत्र
औषधनिर्मिती उद्योग
इलेक्ट्रॉनिक्स व वाहतूक उपकरण उद्योग
आंतरराष्ट्रीय व्यवसाय व निर्यात
ऑटो क्षेत्र
प्रादेशिक विकासावर विशेष चर्चा:
कार्यक्रमात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्र या पाच भागांतील औद्योगिक क्षमतेवर स्वतंत्र चर्चा सत्रे झाली.
विदर्भ: कोळसा, ऊर्जा, खनिज, लाकूड प्रक्रिया
मराठवाडा: अन्न प्रक्रिया, कापूस, कृषी आधारित उद्योग
पश्चिम महाराष्ट्र: साखर, दुग्धोद्योग, MSMEs
कोकण: मत्स्य व्यवसाय, पर्यटन, इलेक्ट्रॉनिक्स
उत्तर महाराष्ट्र: द्राक्ष, केळी प्रक्रिया, कृषी व खाद्य प्रक्रिया
उपस्थित मान्यवर:
मा. देवेंद्र फडणवीस – मुख्यमंत्री, महाराष्ट्र
मा. अजित पवार – उपमुख्यमंत्री
मा. एकनाथ शिंदे – उपमुख्यमंत्री
मा. उदय सामंत – उद्योगमंत्री
मा. दीपक केसरकर व इतर वरिष्ठ अधिकारी
महाराष्ट्राचा औद्योगिक मंत्र – #फॉरएव्हरबिझनेस
या कार्यक्रमात ‘डब्ल्यूईएफ (WEF) २०२४ च्या अहवालानुसार’ भारतातील एकूण परकीय थेट गुंतवणुकीतील ३०% हिस्सा महाराष्ट्राने पटकावल्याचे नमूद करण्यात आले.
राज्यात ५.७२ लाख कोटींची गुंतवणूक प्रस्तावित असून, २६ नव्या औद्योगिक क्षेत्रांत विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.





