१ जुलै २०२५ पासून खासगी क्षेत्रातील दोन आघाडीच्या बँकांनी ग्राहकांसाठी महत्त्वाचे आणि थेट परिणाम करणारे नियम बदल जाहीर केले आहेत. एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक यांच्या नव्या अटी आणि सेवा शुल्कामुळे सर्वसामान्य ग्राहकांवर आर्थिक ताण येण्याची शक्यता आहे.
एचडीएफसी बँकेचे क्रेडिट कार्ड नियम बदलले एचडीएफसी बँकेने आपल्या क्रेडिट कार्डधारकांसाठी काही नवे शुल्क लागू केले आहेत. यामध्ये विशेषतः खालील बाबींचा समावेश आहे:
गेमिंग अॅप्सवर जास्त खर्च केला तर शुल्क: जर ग्राहकांनी दरमहा MPL, Dream11 यांसारख्या गेमिंग अॅप्सवर ₹10,000 पेक्षा जास्त खर्च केला, तर त्यावर 1% पेक्षा जास्त अतिरिक्त शुल्क आकारले जाईल.
थर्ड पार्टी वॉलेट्समध्ये पैसे टाकल्यास शुल्क लागू: Mobikwik, Paytm, Ola Money, Freecharge यांसारख्या वॉलेट्समध्ये ₹10,000 पेक्षा जास्त रक्कम टाकल्यास अतिरिक्त शुल्क लागणार.
इंधन खर्चावरही शुल्क: दरमहा ₹15,000 पेक्षा जास्त इंधनासाठी क्रेडिट कार्ड वापरल्यास 1% शुल्क आकारले जाणार.
वीज, पाणी, गॅस बिलावर मर्यादा ओलांडल्यास शुल्क लागू: जर ग्राहकाने या युटिलिटी बिलांसाठी एकूण ₹50,000 पेक्षा अधिक रक्कम भरली, तर त्यावरदेखील अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. आयसीआयसीआय बँकेने एटीएम व्यवहारांमध्ये बदल केला
ICICI बँकेने ATM आणि IMPS सेवा शुल्कात मोठे बदल जाहीर केले आहेत:
मेट्रो शहरांमध्ये फक्त 3 मोफत व्यवहार: त्यानंतर प्रत्येक एटीएम व्यवहारासाठी ₹23 शुल्क आकारले जाईल.
लहान शहरांमध्ये 5 मोफत व्यवहार: नंतर प्रत्येक व्यवहारासाठी तेच ₹23 लागू होतील.
नगद व्यवहार नसतानाही शुल्क लागू: केवळ शिल्लक तपासण्यासाठी किंवा नॉन-फायनान्शियल व्यवहारासाठीदेखील ₹8.5 प्रति व्यवहार शुल्क आकारले जाईल.
ग्राहकांसाठी सूचनाः आर्थिक नियोजन आवश्यक! या बदलांमुळे ग्राहकांनी आता आपले मासिक व्यवहार आणि डिजिटल खर्च नीट नियोजित करणं अत्यावश्यक ठरणार आहे. अनावश्यक शुल्क टाळण्यासाठी क्रेडिट कार्ड वापर आणि एटीएम व्यवहारांचं वेळापत्रक आखणं गरजेचं आहे.